मुंबईतील दिव्यांग (Handicap) व्यक्तींना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या नियोजन विभागामार्फत आता दिव्यांगांच्या कल्याणासाठी पुनर्वसन केंद्र बनवण्यात येत आहे. अंधेरी पूर्व येथील टाईम्स स्क्वेअरमध्ये तळ अधिक एक मजल्याच्या इमारतीत हे पुनर्वसन केंद्र बनवण्यात येत असून स्वयंम रिहॅबीलीटेशन ट्रस्टच्या माध्यमातून महापालिकेने या दिव्यांगांसाठी कल्याणकारी केंद्र व पुनर्वसन केंद्र सुरु करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. (Handicap Rehabilitation Center)
या जागेची केली निवड
“मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये दिव्यांग (Handicap) व्यक्तींच्या कल्याणार्थ ५ टक्के निधी राखीव ठेवण्यात येतो. तसेच महानगरपालिका स्वायत्त संस्था असल्याने दिव्यांगांच्या कल्याणार्थ विविध योजनांची आखणी करणे व अंमलबजावणी करणे ही महानगरपालिकेची प्रमुख जबाबदारी आहे. त्यानुसार महापालिकेच्या नियोजन विभागामार्फत मुंबईतील दिव्यांग व्यक्तींसाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. मुंबईतील दिव्यांग व्यक्तींसाठी कल्याणकारी केंद्र व पुनर्वसन केंद्र सुरु करण्याचे नियोजन विभागामार्फत विचाराधीन होते. या अनुषंगाने मुंबईतील दिव्यांग (Handicap) व्यक्तींना या केंद्राचा लाभ घेणे सोईस्कर होईल. त्यानुसार मुंबई महानगरपालिका व स्वयंम रिहॅबीलीटेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने प्रायोगिक तत्वावर कल्याणकारी केंद्र व पुनर्वसन केंद्र मरोळ येथील टाईम्स स्क्वेअरमधील समाज कल्याण केंद्राच्या जागेत सुरु करण्याचे नियोजित आहे. (Handicap Rehabilitation Center)
(हेही वाचा – America – Britain Air Strike On Houthi : येमेनमधील हौथी बंडखोरांवर अमेरिका आणि ब्रिटनचा चौथ्यांदा हल्ला)
संस्थेचे असे काम ठाण्यात सुरू आहे
स्वयम रिहॅबीलीटेशन ट्रस्ट ही संस्था गेली अठरा वर्षे जुनी संस्था असून विविध दिव्यांगत्व (Handicap) असलेल्या मुलांसाठी आणि प्रौढांसाठी ठाणे आणि आसपासच्या त्यांच्या काळजी वाहकांसाठी सर्वसमावेशक पुनर्वसन सेवा प्रदान करत आहे. जसे की पॅरामेडीकल सेवा, उपचार शिक्षण, पुनर्वसनाच्या संतुलित मॉडेलद्वारे केंद्र आधारित सुविधा, गृह आधारित पुनर्वसन कार्यक्रम, व्यावसायिक प्रशिक्षण, रोजगार सुलभ करण्यासाठी प्लेसमेंट सेल, सामुदायिक जागरुकता, विशेष क्षमता असणाऱ्या व्यक्तींसाठी संधी विकसित करणे, त्यांना योग्य सहाय्य आणि समर्थन प्रदान करणे आदी प्रकारची कामे संबंधित संस्था करत आहे. सद्यस्थितीत ही संस्था ठाणे महानगरपालिकेसोबत संयुक्त प्रकल्प म्हणून दिव्यांग व्यक्तींसाठी पुनर्वसन केंद्र चालवित आहे. (Handicap Rehabilitation Center)
दिव्यांगांना एकाच छताखाली…
त्यामुळे याच संस्थेची मदत घेऊन मुंबई महानगरपालिकेने मुंबईतही असा प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतला असून हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर सुरु केला जाणार आहे. जर या प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळाल्यास अशाप्रकारचा प्रकल्प इतर ठिकाणीही सुरु केला जाईल असे नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यासाठी अंधेरी पूर्व मरोळ येथील तळ अधिक मजल्याची ६२३ चौरस मीटरची जागा संबंधित संस्थेला पुनर्वसन केंद्र सुरु करण्यासाठी प्रती चौरस मीटर एक रुपया नाममात्र दराने दिली जाणार आहे. त्यामुळे हे पुनर्वसन केंद्र स्थापन झाल्यास सर्व प्रकारच्या दिव्यांगांसाठी (Handicap) एकाच छताखाली संपूर्ण सुसज्ज पुनर्वसन आणि कल्याण केंद्र बनेल. आणि या केंद्रात सेरेब्रल पाल्सी, ऑटिझम, मतिमंदता, ऑर्थोपेडिकली अपंग, श्रवण आणि दृष्टीदोष आणि अशा इतर अपंगत्व असलेल्या मुलांच्या तथा व्यक्तींच्या पुनर्वसनाच्या गरजा पूर्ण होऊ शकतील, असा विश्वास नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. (Handicap Rehabilitation Center)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community