Loksabha Election 2024 : भाजपच्या 100 उमेदवारांची घोषणा होणार गुरुवारी

234
BJP ची 99 उमेदवारांची यादी जाहीर; दोन आमदारांना डच्चू
BJP ची 99 उमेदवारांची यादी जाहीर; दोन आमदारांना डच्चू

लोकसभेच्या (Loksabha Election 2024) एकूण 543 जागांपैकी भाजप आपल्या 100 उमेदवारांची घोषणा 29 फेब्रुवारीला करण्याची शक्यता आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावाचाही समावेश असण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम मार्च महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत भाजपने 400 जागा जिंकण्याचा निर्धार बांधला आहे. त्या दृष्टीने भाजपने पावले उचलण्यासही सुरुवात केली आहे.

400 जागा जिंकण्याची तयारी

एनडीएला 400 हून अधिक जागा जिंकण्यासाठी ही यादी महत्वपूर्ण ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, लोकसभेत सर्वाधिक खासदार पाठवणाऱ्या उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी भाजप अनेक बैठका घेत आहे. उत्तर प्रदेशबाबत शनिवारी झालेल्या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह इतर महत्वाचेही नेते उपस्थित होते.

(हेही वाचा Manoj Jarange Patil : मराठा तरुणांच्या आत्महत्येमागे जरांगे पाटलांची ‘ती’ भाषा कारणीभूत; अजय महाराज बारस्कर यांचा गंभीर आरोप )

गेल्या आठवड्यात, पंतप्रधानांनी भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना 370 जागा जिंकण्याचे पक्षाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी परिश्रमपूर्वक काम करण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी पुढील 100 दिवस महत्त्वपूर्ण असतील, याची आठवणही करून दिली. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या चर्चांमध्ये ज्या राज्यांमध्ये कमकुवत आहे, त्या राज्यात भाजप लक्ष केंद्रीत करत आहे. भाजप त्या जागांसाठी उमेदवारांची यादी लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे.

सत्तेसाठी नाही तर विकासासाठी निवडणूक

सत्तेसाठी नाही तर देशाच्या विकासासाठी निवडणूक जिंकायची आहे. आपण राजनीती नाही तर राष्ट्रनीती करत आहोत. आपल्याला लोकांचा विश्वास जिंकायचा आहे. एनडीएला 400 पर्यंत नेण्यासाठी भाजपला 370 (जागा) चा टप्पा पार करावा लागेल. त्यासाठी पुढील 100 दिवसांत, आपण सर्वांना प्रत्येक नवीन मतदार, प्रत्येक लाभार्थी, प्रत्येक समाजापर्यंत पोहोचायचे आहे, असे आवाहनच त्यांनी राष्ट्रीय अधिवेशनात केले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.