Ind vs Eng Test Match : भारताचा इंग्लंडवर ५ विकेट्सने विजय; ३ – १ ने मालिकाही खिशात

पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने ३ - १ च्या फरकाने मालिका खिशात घातली आहे. रांची येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवर ५ विकेट्सने विजय मिळवला आहे.

211
Ind vs Eng Test Match : भारताचा इंग्लंडवर ५ विकेट्सने विजय; ३ - १ ने मालिकाही खिशात

भारताचे युवा (Ind vs Eng Test Match) फलंदाज फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) आणि व जुरेल हे या विजयाचे हिरो ठरले. इंग्लंडने विजयासाठी भारतासमोर १९१ धावांचं आव्हान दिलं होतं. पण हे पार करताना भारतीय संघाची सुरुवात थोडी वाईट झाली. तर शोएब बशीरच्या फिरकीसमोर भारतीय संघाचे सुरुवातीचे फलंदाज कमी पडले.

(हेही वाचा – Loksabha Election 2024 : भाजपच्या 100 उमेदवारांची घोषणा होणार गुरुवारी)

शुभमन गिल आणि ध्रुव जुरेलची कमाल :

सलामीला आलेला रोहित शर्मा (Rohit Sharma) ५५ धावा करुन बाद झाला. तर रजत पाटीदार आणि सर्फराज खान शून्यावर बाद झाले. यशस्वी जयस्वलाने ३७ धावा केल्या तर रवींद्र जडेजा केवळ ४ धावा करुन पॅव्हेलिअनमध्ये परतला. एकामागोमाग एक निम्मा संघ गारद झाल्याने सोपं वाटणारं आव्हानही नंतर कठिण होऊन बसलं. अशातच शुभमन गिल (Ind vs Eng Test Match) आणि ध्रुव जुरेल या युवा खेळाडूंनी भारतीय संघाची बाजू सावरली; आणि मालिका विजय आपल्या नावावर करून घेतला.

६३ धावांची नाबाद पार्टनरशिप :

शुभमन गिल आणि ध्रुव जुरेल (Ind vs Eng Test Match) या दोघांनी सहाव्या विकेटासाठी ६३ धावांची नाबाद पार्टनरशिप केली. शुभमन गिलने नाबाद ५२ धावा केल्या, तर ध्रुव जुरेलने नाबाद ३९ धावा केल्या. या दोघांच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडवर शानदार विजय मिळवला. मालिका विजयाबरोबर भारताने आयसीसी टेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या पॉईंटटेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली असून पहिल्या स्थानावर न्यूझीलंड तर तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया आहे.

(हेही वाचा – WPL 2024 : मुंबई इंडियन्सची गुजरात जायंट्सवर ५ गडी राखून मात)

अश्विनने तब्बल पाचव्यांदा ५ विकेट घेण्याची कामगिरी केली :

आर अश्विनने अवघ्या ५१ धावात पाच (Ind vs Eng Test Match) विकेट घेतल्या. अश्विनने तब्बल पाचव्यांदा ५ विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. तर कुलदीप यादवने ४ विकेट घेतल्या. रवींद्र जडेजाच्या वाटेला एक विकेट आली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.