- ऋजुता लुकतुके
मेटा कंपनीचं लक्ष येत्या दिवसांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील विकासावरच असणार आहे. आणि कंपनीचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्या आशिया दौऱ्याचा छोटेखानी कार्यक्रमही त्या भोवतीच आखण्यात आला आहे. आपल्या एका आठवड्याच्या आशिया दौऱ्यात ते जपान, दक्षिण कोरिया आणि भारत या देशांचा दौरा करणार आहेत. पैकी भारतात ते मुकेश अंबानींचा (Mukesh Ambani) मुलगा आकाश अंबानीच्या लग्नाला हजर राहणार आहेत. (Mark Zuckerberg in Asia)
सध्या ते आपल्या कुटुंबीयांबरोबर जपानमध्येच आहेत. आणि तिथे सुटी घालवल्यानंतर मेटाच्या जपानमधील डेव्हलपर्सबरोबर चर्चेनं कामाला सुरुवात करणार आहेत. टोकयोमध्ये होणाऱ्या बैठकीचा विषय अर्थातच लॅमा या कंपनीच्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रोग्रामचा विकास हाच असणार आहे. चॅट-जीपीटीशी या प्रोग्रामची स्पर्धा असणार आहे. (Mark Zuckerberg in Asia)
(हेही वाचा – PM Narendra Modi : ‘विकसित भारत’ च्या गॅरंटीसह पंतप्रधानांनी केले २ हजारहून अधिक रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन)
दक्षिण कोरियातही झुकरबर्ग देशाचे अध्यक्ष यून सुक येओल यांची भेट घेणार आहेत. तसंच सॅमसंग आणि एलजी कंपन्यांच्या सीईओंशी त्यांची भेटही महत्त्वाची आहे. कारण, लॅमा प्रोग्रामचा या दोन कंपन्यांच्या फोनमध्ये वापर व्हावा यासाठी ते कराराची बोलणी करण्याची शक्यता आहे. मेटा आणि सॅमसंग कंपनी यापूर्वी व्हर्चुअल रियालिटी क्षेत्रात एकत्र आले होते. (Mark Zuckerberg in Asia)
२०१६ साली सॅमसंगच्या अनपॅकिंग सोहळ्यालाही त्यांनी हजेरी लावली होती. आता कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात विस्ताराच्या संधी मार्क झुकरबर्ग शोधत आहेत. दक्षिण कोरियानंतर झुकरबर्ग यांचा पुढील मुक्काम हा थेट भारतात जामनगर इथं असणार आहे. या आठवड्याच्या शेवटी मुकेश अंबानी यांचा सगळ्यात लहान मुलगा आकाश अंबानीचा विवाह राधिका मर्चंटशी होणार आहे. आणि त्या सोहळ्यासाठी मार्क झुकरबर्ग उपस्थित राहणार आहेत. (Mark Zuckerberg in Asia)