स्वातंत्र्यवीरांनी वर्णिलेल्या भारताच्या दैदिप्यमान इतिहासातील तेजस्वी ताऱ्यांना मानवंदना देणारा दृकश्राव्य ‘साहित्यसूर्य सावरकर’ या सांगितिक कार्यक्रमाचा शुभारंभ स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात रविवारी झाला. या कार्यक्रमाची संहिता आणि संकल्पना स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांची असून कार्यक्रमाचे संगीत संयोजन-दिग्दर्शन वर्षा भावे यांनी केले आहे. कार्यक्रमाकरिता स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर (Veer Savarkar) यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
वीर सावरकर यांनी वर्णिलेल्या क्रांतिकारकांच्या विचारांवर आधारित कार्यक्रम
‘साहित्यसूर्य सावरकर’ या कार्यक्रमाविषयी मंजिरी मराठे यांनी सांगितले की, २००७ साली ‘शतजन्म शोधताना’ कार्यक्रम केला. त्यामध्ये लावणी, पोवाडा, फटका अशा लोकगीतांचा समावेश होता. वीर सावरकर यांच्या विचारांवर आधारित तो पहिला कार्यक्रम होता. आता नव्याने सादर होणाऱ्या ‘साहित्यसूर्य सावरकर’या कार्यक्रमात वीर सावरकरांनी शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बाजीराव पेशवे, झाशीची राणी, तात्या टोपे, वाघनखं, मातृभूमी यांच्याविषयी अतिशय सुंदर लिखाण केले आहे. यावर आधारित हा कार्यक्रम आहे. यामध्ये वीर सावरकरांच्या काही नवीन स्वरबद्ध केलेल्या गाण्यांचं सादरीकरण होणार आहे. अशा पद्धतीच्या अनोख्या कार्यक्रमाचा हा पहिलाच प्रयत्न आहे.
(हेही वाचा – Kolhapur Mahalaxmi Temple : जाणून घ्या महालक्ष्मी मंदिरातील ‘या’ प्रसिद्ध पाच उत्सवांबद्दल )
नवीन सांगितीक रचना – संगीत दिग्दर्शिका वर्षा भावे
या कार्यक्रमाच्या संगीत दिग्दर्शिका वर्षा भावे यांनी या अनोख्या कार्यक्रमाविषयी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, २००७ साली ‘शतजन्म शोधताना’ या एका भव्य कार्यक्रमाने आम्ही वीर सावरकरांबद्दल काम करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर ‘साहित्यसूर्य सावरकर’ या कार्यक्रमासाठी मंजिरी मराठे यांनी माझ्यासमोर वीर सावरकरांचा ग्रंथ ठेवला आणि म्हणाली की, यातल्या रचना आपल्याला करायच्या आहेत आणि नवीन चाली करायच्या आहेत. या कार्यक्रमाची संपूर्ण संकल्पना आणि संहिता लेखन त्यांनीच केले आहे. तेव्हापासून ‘साहित्यसूर्य सावरकर’ कार्यक्रमाचा प्रवास सुरू झाला आणि त्यात आम्ही दिवसेंदिवस अतिशय मनापासून गुंतत गेलो. कलांगणच्या आमच्या सगळ्या मुलांना, तरुणांनाही हा कार्यक्रम करताना खूपच आनंद मिळतो. कार्यक्रमाची संकल्पना रसिकांना आवडली असेल, अशी खात्री वाटते.
या कार्यक्रमाचे संगीत संयोजन कमलेश भडकमकर, सोमेश नार्वेकर यांनी केले आहे. कलाकार श्रीरंग भावे, मयूर सुकाळे, पार्थ महाजन, सायली महाडिक, दिशा देसाई, अमृता मोडक, क्षितिजा जोशी, स्मयन आंबेकर यांचा या कलाकृतीत सहभाग असून सूत्रसंचालन रोहन देशमुख, कुहू दातार यांनी, तर दृष्य चित्रण रोहन गायतोंडे यांनी केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community