Veer Savarkar : … म्हणून आपण सावरकरांना हिंदुहृदयसम्राट म्हणतो; गिरीश दाबके यांच्याकडून सावरकर विचारांना उजाळा

Veer Savarkar : भारतीय राजकारणात हिंदूच महत्त्वाचा आहे आणि तोच बदल घडवू शकतो, असे वीर सावरकर सांगत असत. ज्या देशामध्ये ८० टक्के समाज हिंदू आहे, त्या देशात मुसलमान सांगतात की, हा देश आमचा आहे, तेव्हा सावरकरांनी घोषणा केली की, हे हिंदु राष्ट्र आहे, असे गिरीश दाबके म्हणाले.

194
Veer Savarkar : ... म्हणून आपण सावरकरांना हिंदुहृदयसम्राट म्हणतो; गिरीश दाबके यांच्याकडून सावरकर विचारांना उजाळा
Veer Savarkar : ... म्हणून आपण सावरकरांना हिंदुहृदयसम्राट म्हणतो; गिरीश दाबके यांच्याकडून सावरकर विचारांना उजाळा

हिंदू समाज जर जागा झाला, तर आपले राष्ट्र सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनेल. या देशाला सर्वश्रेष्ठ फक्त हिंदूच बनवू शक्तो. आम्हाला कोणा दुसऱ्या धर्माची मदत नको. जर त्यांना यायचे असेल तर येऊ शकता; पण आम्ही त्यांना ‘या हो’, ‘या हो’ करून बोलवत नाही. भारतीय राजकारणात हिंदूच महत्त्वाचा आहे आणि तोच बदल घडवू शकतो, असे वीर सावरकर (Veer Savarkar) सांगत असत. ज्या देशामध्ये ८० टक्के समाज हिंदू आहे, त्या देशात मुसलमान सांगतात की, हा देश आमचा आहे, तेव्हा सावरकरांनी घोषणा केली की, हे हिंदु राष्ट्र (Hindu Rashtra) आहे. यासाठी आपण सावरकरांना हिंदुहृदयसम्राट म्हणतो, असे गौरवोद्गार गिरीश दाबके (Girish Dabke) यांनी काढले.

२६ फेब्रुवारी २०२४ रोजी दादर येथील पाटील मारुती मंदिर सभागृहात सावरकर भक्तांचा मेळावा पार पडला. हा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनाच्या निमित्ताने’हिंदु महासभा परेल’ आणि ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ यांच्या संयुक्त विद्यामाने पार पडला. त्या वेळी दाबके बोलत होते. या वेळी व्यासपिठावर अध्यक्ष दिनेश भोगले, मुख्य अतिथी अनुप केणी हेही उपस्थित होते.

(हेही वाचा – Jyoti Waghmare: आंदोलनाचा उद्देश आरक्षण आहे की राजकारण? शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांची टीका)

सावरकरांनी ‘अहिंदूंना हाकलून द्या’ म्हटलेले नाही

या वेळी बोलतांना गिरिश दाबके यांनी वीर सावरकरांच्या हिंदुत्वाचे विविध पैलू उलगडून सांगितले. ते म्हणाले की, आजपर्यंत मी अनेक ठिकाणी सावरकरांच्या चरित्रावर व्याख्यान दिले. त्या अनुभवांतून एवढे कळले की, अनेक ठिकाणी सावरकरांविषयी फार गैरसमज आहेत. गांधी हत्या प्रकरणात सावरकरांना जास्तीत जास्त बदनाम केले गेले. नंतरही अनेक आक्षेप मला ऐकायला मिळाले.

एक जण म्हणाला, “सावरकर सर्व मुसलमानांना बाहेरच हाकलायला निघाले आहेत.” मी म्हटले, “असे कोणी सांगितले तुम्हाला? सावरकर मुसलमानांना बाहेर हाकलायला निघालेले नाहीत. फक्त ‘त्यांनी या देशाच्या रिती-रिवाजाप्रमाणे इथे रहावे’, असे सांगितले आहे. सावरकर असे म्हणतात की, “त्यांच्या डोळ्यांवर आज पट्ट्या बांधल्या गेल्या आहेत की, ‘तुम्ही मुसलमान आहात.’ तुमचे पूर्वज हिंदूच होते. तुम्ही डोळ्यांवरची पट्टी काढून टाका एवढेच सावरकरांनी सांगितले आहे. त्यांच्या कोणत्याही साहित्यात सावरकरांनी कधीही ‘अहिंदूंना हाकलून द्या’, असे म्हटलेले नाही. ‘अहिंदूंना मताधिकार असू नये’, असेही त्यांनी म्हटलेले नाही.

पतित पावन मंदिर हा अद्भुत चमत्कार

सावरकरांनी देव आणि देवळांच्या बाबतीत भारताच्या इतिहासात कधी घडला नसेल, असा चमत्कार घडवून आणला. १९३२ साली रत्नागिरी हे खेडेगाव होते. त्या काळी त्यांनी तेथे पतित पावन मंदिराची स्थापना केली. सावरकरांचे क्रांतिकारी महत्त्व तर होतेच; पण पतित पावन मंदिर (Patit Pavan Mandir) हेही त्यांच्या जीवनातील एक अद्भुत चमत्कारापेक्षा कमी नव्हते. असा चमत्कार गेल्या १ हजार वर्षात भारतात झाला नाही आहे. जे बाकी लोकांना सुचत नाही, ते सावरकरांना सुचते.

असे म्हणतात की, सिंह जेव्हा चालत असतो, तेव्हा त्याची नजर एकीकडे असते आणि तो दुसरीकडे चालत असतो. सावरकरसुद्धा तसेच होते. एकीकडे गर्जना करत असत आणि एकीकडे चालत असत. जेव्हा विचारासोबत आचार असतो, तेव्हा त्याचा आपोआप प्रचार होतो. सावरकरांचे हे पतित पावन मंदिराच आचार आणि प्रचार झाला.

(हेही वाचा – Defense Expo 2024: लष्कर प्रमुखांनी महाराष्ट्र एमएसएमई ‘डिफेन्स एक्स्पो 2024’ ला भेट दिली)

हा मनुष्य हिंदु धर्म प्रचारक होता

सावरकर म्हणत असत की, माझ्या जीवनावर फक्त एकाच वाक्य लिहा की, ‘हा मनुष्य हिंदू धर्म प्रचारक होता’, त्या शिवाय काही लिहू नका. फक्त हे एक वाक्य माझ्या जीवनाधारित असेल. हिंदुत्वावर (Hinduism) सावरकरांचे एक सुरेख वाक्य आहे की, काश्मीरपासून रामेश्वरपर्यंत ही प्रचंड भूमी ही स्वतःची मातृभूमी आणि पुण्यभूमी म्हणून ओळखली जाते. असे मानणारा समाज हिंदू समाज आहे.

सावरकरांनी म्हटले की, प्रत्येक माणसाला या देशात मत देण्याचा अधिकार आहे. त्याची आर्थिक परिस्थिती काहीही असो. प्रत्येक भारतियाला मत देण्याचा अधिकार आहे. हा विचार फक्त सावरकरांचा आहे की, मत देण्याचा अधिकार सर्वांना मिळावा.

सावरकरांनी म्हटल्याप्रमाणे सगळे घडले

१९२३ साली ते रत्नागिरीच्या तरुंगात गेले आणि त्यांनी सांगितले की, तिथे त्यांच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार दोनदा आला. हिंदुत्व हे त्यांच्या ग्रंथाचे नाव आहे. हा शब्द तोपर्यंत फक्त सावरकरांनी वापरला होता. त्यांच्याशिवाय तो कोणीही वापरला नाही. जर आज आपण भारताच्या नकाशावर नजर टाकली आणि भारताच्या घडामोडीवर नजर टाकली, तर सावरकरांनी जे म्हटले होते, ते सगळे तसेच्या तसे घडलेले आहे. सामान नागरी कायदा होत आहे, तीन तलाक विरोधी कायदा झाला आहे, सैन्यात भरती होत आहे.

सावरकरांचे विचार अजूनही जिवंत

अशा थोर व्यक्तीविषयी कितीही बोलले, तरी कमीच आहे. आपण त्यांचे भक्त आहोत आणि ते आपले दैवत आहेत. आज आपण म्हणू शकतो की, भले सावरकर गेले; पण सावरकरांचे हिंदुत्ववादी विचार अजूनही आपल्यात जिवंत आहेत.

आज आपण सावरकरांचा आत्मार्पण दिन साजरा करत आहोत; कारण ते पराक्रमी हते. जेव्हा जेव्हा पराक्रम घडवला गेला, तेव्हा तेव्हा तो साजरा झाला. येत्या काळात अजून काही पराक्रम झाले पाहिजेत. आज एका डॉलरचे मूल्य ८० रुपये आहे, आता ८० डॉलरचे मूल्य १ रुपया झाले पाहिजे. पाकिस्तानचा भारतात समावेश झाला पाहिजे. असे पराक्रम घडण्याची ताकद फक्त सावरकरांच्या तत्वज्ञानात आहे, असे परखड प्रतिपादन दाबके यांनी केले. (Veer Savarkar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.