Manoj Jarange Patil: यांच्या मागे आमदार, जालन्याचा भैय्या असल्याचा आरोप, ते आमदार आणि भैय्या कोण?

Eknath Shinde यांचा जरांगेना गर्भित इशारा

319
Manoj Jarange: अनवधानाने ते झालं असेल... मी माझे शब्द मागे घेतो; जरांगेंनी मागितली देवेंद्र फडणवीसांची माफी
Manoj Jarange: अनवधानाने ते झालं असेल... मी माझे शब्द मागे घेतो; जरांगेंनी मागितली देवेंद्र फडणवीसांची माफी

मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्यामागे राष्ट्रवादी कॉँग्रेस (शप) (NCP) प्रमुख शरद पवार असल्याचा प्रत्यारोप अनेक भाजप नेत्यांनी केला आहे. तर काहींनी यामागे पवार कुटुंबातील राष्ट्रवादी (शप) (NCP) गटाचे एक आमदार आणि जालन्याचा भैय्या असल्याचा आरोप केला आहे. हे आमदार आणि भैय्या म्हणजे कोण? याबाबत काल रविवारपासून प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

फडणवीसांवर गंभीर आरोप

जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अंतरवाली सराटी येथे रविवारी २४ फेब्रुवारीला पत्रकार परिषदेत आरोप करताना, “मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत असून, त्यांना माझा बळी हवा आहे. मी आता फडणवीसांच्या सागर बंगल्यासमोर जाणार असून, माझा जीव घ्या,” असा आरोप केला. तसेच आपल्याला सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केल्याचा गंभीर आरोपही जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी केला.

ठाकरे, पवारांची स्क्रिप्ट

यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, “मराठा आरक्षण हायकोर्टात आणि सर्वोच्च न्यायालयातसुद्धा टिकवलं. त्यामुळे कोणीही बोलला म्हणून मराठा समाज विश्वास ठेवेल, असं म्हणणारा मी नाही. जी स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे, शरद पवार बोलत होते, तीच स्क्रिप्ट जरांगे का बोलत आहेत? हा प्रश्न आहे. याचा काही अंदाज आम्हाला आहे. आम्ही योग्यवेळी बाहेर काढू. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन लागेल ते सर्व करेल,” असे गर्भित इशाराही फडणवीस यांनी दिला.

(हेही वाचा – Jyoti Waghmare: आंदोलनाचा उद्देश आरक्षण आहे की राजकारण? शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांची टीका)

मुख्यमंत्र्यांचा गर्भित इशारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या आरोपांची गंभीर दाखल घेत जरांगे “मर्यादेत बोलावे, संयमाचा अंत पाहू नये,” तसेच “कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही,” असा इशाराच दिला.

राजेशभैय्या

काही भाजप नेत्यांनी जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या मागे पवार कुटुंबातील आमदार आणि जालनाचा भैय्या असल्याचा उल्लेख वारंवार होताना दिसत होते. तर हे पवार कुटुंबातील आमदार म्हणजे रोहित पवार असून जालनाचा भैय्या म्हणजे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी शप गटाचे आमदार राजेश टोपे असल्याचे भाजप गोटातून सांगण्यात आले. त्यामुळे पुढील काही दिवस त्यांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्यात आले तर आश्चर्य वाटायला नको. टोपे यांना स्थानिक पाठळीवर त्यांचे कार्यकर्ते ’भैय्या’ म्हणजे भाऊ अशा अर्थाने संबोधतात.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.