Veer Savarkar: वीर सावरकरांना मरणोत्तर बॅरिस्टर उपाधी प्रदान करा – अ‍ॅड. पारिजात पांडे

'मी ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहण्याचा विचारही करू शकत नाही', असे ठणकावून सांगून बॅरिस्टरची पदवी धुडकावणारे क्रांतिवीर सावरकर हे पहिले भारतीय होते.

200
Veer Savarkar: वीर सावरकरांना मरणोपरांत बॅरिस्टर उपाधी प्रदान करा - अ‍ॅड. पारिजात पांडे
Veer Savarkar: वीर सावरकरांना मरणोपरांत बॅरिस्टर उपाधी प्रदान करा - अ‍ॅड. पारिजात पांडे

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारकांचे मुकुटमणी, द्रष्टे समाजसुधारक, प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Veer Savarkar) यांना मरणोपरांत बॅरिस्टर उपाधी देण्यासंदर्भात पाठपुरावा करा, अशी मागणी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे अध्यक्ष अ‍ॅड. पारिजात पांडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारला (Central Govt) पाठपुरावा करण्याची विनंती करण्यात येईल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

‘मी ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहण्याचा विचारही करू शकत नाही’, असे ठणकावून सांगून बॅरिस्टरची पदवी धुडकावणारे क्रांतिवीर सावरकर हे पहिले भारतीय होते. त्यांनी आपल्या क्रांतिकारी विचारांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे १९०६ मध्ये ब्रिटनला गेले आणि तेथे त्यांनी आपले कायद्याचे शिक्षण पूर्ण केले, मात्र उत्तीर्ण होऊनही त्यांचे स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक म्हणून असणाऱ्या योगदानामुळे ब्रिटिश सरकारने (British Govt) त्यांना बॅरिस्टर उपाधी प्रदान केली नाही.

आता ती बॅरिस्टरची उपाधी मरणोपरांत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना प्रदान करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, अशी विनंती करणारे निवेदन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे अध्यक्ष अ‍ॅड. पारिजात पांडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.