Veer Savarkar : राममंदिराची उभारणी ही सावरकरांनी जागृत केलेल्या हिंदूंच्या पराक्रमी इतिहासाचीच आवृत्ती – पद्मश्री दादा इदाते

381
Veer Savarkar : राममंदिराची उभारणी ही सावरकरांनी जागृत केलेल्या हिंदूंच्या पराक्रमी इतिहासाचीच आवृत्ती - पद्मश्री दादा इदाते
Veer Savarkar : राममंदिराची उभारणी ही सावरकरांनी जागृत केलेल्या हिंदूंच्या पराक्रमी इतिहासाचीच आवृत्ती - पद्मश्री दादा इदाते

सावरकरांनी केवळ हिंदुत्वाच्या विचारांचा प्रचार केला नाही, तर ‘हिंदूंचा इतिहास पराजयाचा नाही’, हे ‘सहा सोनेरी पाने’ या ग्रंथातून सांगितले. त्यानंतर त्याचे जगव्यापी संदर्भ निर्माण होत गेले. पहिला आधुनिक संदर्भ अयोध्येतील राममंदिराच्या पुनर्निर्माणाचा प्रसंग आहे, असे गौरवोद्गार सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री दादा इदाते यांनी काढले.

२६ फेब्रुवारी या स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या आत्मार्पण दिनाच्या औचित्याने ‘वीर सावरकर’ या हिंदी चित्रपटाच्या आधुनिक आवृत्तीचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात दादा इदाते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे सचिव रवींद्र माधव साठे (Ravindra Madhav Sathe) आणि वीर सावरकरांचे नातू व स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर हे उपस्थित होते.

(हेही वाचा – Veer Savarkar : … म्हणून आपण सावरकरांना हिंदुहृदयसम्राट म्हणतो; गिरीश दाबके यांच्याकडून सावरकर विचारांना उजाळा)

‘सावरकर दर्शन प्रतिष्ठान’ची निर्मिती असलेला आणि ज्येष्ठ संगीतकार स्वर्गीय सुधीर फडके यांच्या परिश्रमातून तयार झालेला ‘वीर सावरकर’हा HD 4K या आधुनिक तंत्रज्ञानासह तयार करण्यात आला आहे. तसेच काळानुसार त्याचा कालावधीही ३ तास १० मिनिटांवरून कमी करून १ तास ५० मिनिटे करण्यात आला आहे. या नव्या आवृत्तीच्या पोस्टरचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करून लोकार्पण करण्यात आले.

‘सावरकर दर्शन प्रतिष्ठान मुंबई’ (Savarkar Darshan Pratishthan) आणि ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या चित्रपटात अभिनेते शैलेंद्र गौड यांनी सावरकरांची भूमिका केली आहे. त्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. युवा गायक आणि कलाकार रोहन देशमुख याने वीर सावरकर यांच्या ‘अनादी मी अवध्य मी’ या गीताचे गायन केले आहे. रणजित सावरकर यांनी या गीताचे हिंदी रूपांतरण केले आहे. त्याचे लोकार्पण या कार्यक्रमात करण्यात आले. तसेच माधव भागवत यांनी संगीत दिलेल्या नूतन सावरकर वंदनेचेही लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

गांधींच्या काळात हिंदू हा शब्द मागे पडला

या वेळी बोलतांना दादा इदाते यांनी हिंदुत्वाच्या विचारांचा प्रसार कशा पद्धतीने सुरु झाला, याविषयी सांगितेल. ते म्हणाले की, आपला देश पारतंत्र्यात होता. तेव्हा हिंदू समाज हा जगण्याच्या लायकीचा समाज नाही. त्याच्यावर इतरांनी राज्यच केले पाहिजे, असा विचार दृढ होता. अशा कालखंडात जागतिक धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी ‘हिंदु धर्म श्रेष्ठ आहे, हा पहिला विचार मांडला गेला. नंतरच्या काळात लाल-बाल-पाल यांनी धार्मिक राष्ट्रवाद उभा केला. स्वामी अरविंद यांनी त्याचे देशव्यापी संदर्भ उभे केले. लोकमान्य टिळकांच्या निधनाने मात्र सांस्कृतिक राष्ट्रवादाला खिळ बसली. देशाचे नेतृत्व मोहनदास गांधींच्या हाती आले. गांधींच्या काळात हिंदी राष्ट्रवाद उभा राहिला. हिंदू हा शब्द मागे पडला. कम्युनिझम म्हणजेच समाजवाद पुढे आला. ‘धर्म ही अफूची गोळी आहे’, अशा पद्धतीचा विचार जोर धरू लागला. ‘धर्म, संस्कृती नको’ म्हणजे ‘हिंदु धर्म नको, हिंदु संस्कृती नको’, अशा पद्धतीच्या विचारांचा प्रभाव वाढू लागला.

वीर सावरकर यांनी केली हिंदूंची व्याख्या

अशा काळात वीर सावरकर यांनी हिंदूंची व्याख्या केली. १९२३ मध्ये त्यांनी हिंदुत्व ग्रंथ लिहिला. त्यानंतर १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. ‘मी हिंदू आहे’, ही मानसिकता हिंदूंच्या मनात निर्माण झाली.

सर विन्स्टन चर्चिल यांनी मागे म्हटले होते, भारत हा देश नाही, तर तो केवळ लोकांचा समूह आहे. (India is not a nation its population) त्या वेळी ब्रिटनमधील हॉटेलबाहेर ‘भारतीय आणि कुत्रे यांना प्रवेश नाही’ (Indians and dogs are not allowed) अशा पाट्या लावल्या जात असत. आज त्याच ब्रिटनवर एक भारतीय व्यक्ती राज्य करत आहे, असे दादा इदाते या वेळी म्हणाले.

(हेही वाचा – Dadar : दादरमध्ये या भागातील शेतकरी महिलांना बसतोय महापालिका कारवाईचा फटका)

एकसंध हिंदू समाज निर्माण झाला, तर चित्रपटाचे सार्थक होईल – रणजित सावरकर (Ranjit Savarkar)

New Project 2024 02 26T220059.111

सावरकरांनी आपल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, पुढील काळात नाट्यसृष्टी अस्तंगत होईल; परंतु चित्रपटसृष्टी जगावर अधिराज्य करेल. त्या वेळी सावरकरांनी तरुणांना आवाहन केले होते की, चित्रपटसृष्टीत सहभागी व्हा. माझ्या लहानपणीची गोष्ट आहे. या चित्रपटाच्या निर्मितीचे कार्य करण्यासाठी बाबूजी झपाटले होते. मी काही निरोप देण्यासाठी जेव्हा जेव्हा बाबूजींच्या घरी गेलो, तेव्हा त्यांचे भारावलेपण जाणवत होते. सावरकरांचे तत्वज्ञान होते की, अत्याधुनिक तंत्रज्ञान हवे. त्यानुसार आता हा चित्रपट आधुनिक तंत्रज्ञानासह सादर होत आहे, याचा आनंद आहे.

या चित्रपटातून तरुणांनी प्रेरणा घेतली पाहिजे. आज हिंदु समाज जातीजातींत विभागला गेला आहे. प्रत्येक जात आज २ टक्केच राहिली आहे. देशाची पुन्हा फाळणी झाली, तर जगात कुठे जायला सुरक्षित जागाही नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीत जात्युच्छेदन केले. त्यातून धडा घेऊन एकसंध हिंदू समाज निर्माण झाला, तर चित्रपटाचे सार्थक होईल.

प्रत्येकाने सावरकरांच्या विचारांचे दूत बनावे – रवींद्र माधव साठे

सुधीर फडके यांच्या त्यागाने हा चित्रपट तयार झाला आहे. त्यांनी यासाठी १७ वर्षे परिश्रम घेतले आहेत. हा चित्रपट तयार झाला आणि २००२ साली बाबूजींचे निधन झाले. त्या वेळी हा सिनेमा केवळ हिंदी भाषेत होता. बाबूजींची इच्छा होती की, हा चित्रपट सगळ्या भाषांत तयार व्हावा. त्यानुसार आम्ही पुढाकार घेऊन मराठी, गुजराती भाषांत तो तयार केला आहे. येत्या काळात दक्षिण भारतीय भाषांतही तो तयार करणार आहोत. आता आम्ही नवीन तंत्रज्ञानासह तो प्रदर्शित केला आहे. हा चित्रपट पाहून प्रत्येकाने सावरकरांच्या विचारांचे दूत बनावे, असे मी आवाहन करतो. (Veer Savarkar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.