Pise Water Pumping Station : पिसे येथील पंपिंग स्टेशनमधील ट्रान्सफार्मरला आग

मुंबई शहर आणि पूर्व उपनगरामधील काही भागांतील पाणीपुरवठयावर होणार परिणाम

1701
Pise Water Pumping Station : पिसे येथील पंपिंग स्टेशनमधील ट्रान्सफार्मरला आग
Pise Water Pumping Station : पिसे येथील पंपिंग स्टेशनमधील ट्रान्सफार्मरला आग
विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महानगरपालिकेच्या पिसे येथील जल उदंचन केंद्रात (pumping station) संयंत्राला आग लागण्याची घटना सोमवारी २६ फेब्रुवारी २०२४ घडली. या घटनेमुळे मुंबई पूर्व उपनगरांमधील पूर्वेचा भाग तसेच शहर विभागातील गोलंजी, फोसबेरी, रावळी तसेच भंडारवाडा जलाशयांमधून होणारा पाणीपुरवठा बाधित झाला आहे. त्यामुळे, या भागांमध्ये पुढील २४ तास पाणीपुरवठा होणार नाही. तसेच याचा परिणाम पश्चिम उपनगर आणि शहर विभागातील इतर भागातील पाणी पुरवठ्याच्या दाबावर काही प्रमाणात पडेल. त्यामुळे, संबंधित भागांमधील नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. (Pise Water Pumping Station)

(हेही वाचा – Veer Savarkar : … म्हणून आपण सावरकरांना हिंदुहृदयसम्राट म्हणतो; गिरीश दाबके यांच्याकडून सावरकर विचारांना उजाळा)

पिसे येथे मुंबई महानगरपालिकेचे जल उदंचन केंद्र आहे. सोमवारी सायंकाळी येथील क्रमांक दोन ट्रान्सफार्मरला आग लागल्याने संपूर्ण प्रकल्पातील वीजपुरवठा खंडीत करण्यात आला. परिणामी सर्व पंप बंद झाले आहेत. घटनास्थळी आग आटोक्यात आल्यानंतर संयंत्र दुरुस्ती करुन उदंचन केंद्र लवकरात लवकर कार्यान्वित करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल. त्यामुळे, संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे व महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात येत आहे. (Pise Water Pumping Station)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.