डिव्हाईन कॉमेडी नावाच्या पुस्तकाचे भाषांतर करणारे अमेरिकेतील पहिले साहित्यिक Henry Longfellow

हेन्री आपल्या काळातले सर्वाधिक लोकप्रिय कवी होते. पण तरीही त्यांनी आपल्या कवितांमध्ये युरोपियन शैलीचं अनुकरण केलं अशी टीकाही त्यांच्यावर करण्यात आली होती.

167
डिव्हाईन कॉमेडी नावाच्या पुस्तकाचे भाषांतर करणारे अमेरिकेतील पहिले साहित्यिक Henry Longfellow

हेन्री लॉंगफेलो (Henry Longfellow) ते एक साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांच्या प्रमुख काव्यसंग्रहांमध्ये इव्हेंजेलीन, पॉल रेव्हर्स राईड आणि द सॉंग्स ऑफ हियावथा या कवितासंग्रहांचा समावेश आहे. त्यांनी डिव्हाईन कॉमेडी नावाच्या पुस्तकाचे भाषांतर केले होते. तसं करणारे ते अमेरिकेतील पहिले व्यक्ती होते. एवढंच नव्हे तर ते इंग्लंडमधल्या फायरसाईड कवींपैकी एक कवी होते. (Henry Longfellow)

त्यांचा जन्म यांचा जन्म २७ फेब्रुवारी १८०७ साली पोर्टलॅंड येथे झाला. त्यांनी आपलं पदवी शिक्षण बोडॉईन कॉलेजमधून पूर्ण केलं. त्यानंतर ते हावर्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापकाचं काम करायला लागले. नोकरी करता करता त्यांनी कविता लिहिणंही सुरूच ठेवलं. व्हॉईसेस ऑफ द नाईट आणि बलाड्स अँड अदर पोएम्स हे दोन त्यांचे सर्वात पहिले प्रमुख काव्यसंग्रह होते. (Henry Longfellow)

(हेही वाचा – Ramdara Temple : पुण्यामध्ये आहे प्रभू श्रीरामांचं सुंदर देऊळ; रामदरा मंदिर)

हेन्री आपल्या काळातले सर्वाधिक लोकप्रिय कवी

१८५४ साली हेन्री (Henry Longfellow) यांनी आपल्या लिखाणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी नोकरी सोडली. त्यानंतर ते पूर्णवेळ लिहायला लागले. हेन्री लॉंगफेलो यांनी अनेक अशी गाणी लिहिली आहेत ज्यांचे संगीत लोकप्रिय झाले. हेन्री आपल्या काळातले सर्वाधिक लोकप्रिय कवी होते. पण तरीही त्यांनी आपल्या कवितांमध्ये युरोपियन शैलीचं अनुकरण केलं अशी टीकाही त्यांच्यावर करण्यात आली होती. (Henry Longfellow)

हेन्री लॉंगफेलो यांचं वैयक्तिक आयुष्य फारसं चांगलं नव्हतं. त्यांची पहिली बायको मेरी पॉटर ही तिचा गर्भपात झाल्यानंतर मरण पावली. त्यानंतर कालांतराने त्यांनी दुसरं लग्न फ्रान्सिस ऍप्लटन हिच्याशी केलं. पण एक दिवस तिच्या कपड्यांना आग लागली आणि त्या अपघातात तीही होरपळून मेली. ती गेल्यानंतर हेन्री लॉंगफेलो हे काही काळ डिप्रेशनमध्ये गेले. त्यांना कविता सुचेनाशी झाली. मग त्यांनी इतर परदेशी भाषांतल्या पुस्तकांचं आपल्या भाषेत भाषांतर करायला सुरुवात केली. २४ मार्च १८८२ साली हेन्री लॉंगफेलो यांचा मृत्यू झाला. (Henry Longfellow)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.