City Civil Court : मुंबईच्या सिटी सिव्हिल कोर्ट केससाठी योग्य वकील कसा निवडायचा?

सिटी लॉयर म्हणजेच दिवाणी वकील, ज्याला आपण लिटिगेटर म्हणतो. हे वकील गुन्हेगारी पार्श्वभूमी व्यतिरिक्त दिवाणी खटले हाताळण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

247
City Civil Court : मुंबईच्या सिटी सिव्हिल कोर्ट केससाठी योग्य वकील कसा निवडायचा?

दामिनी चित्रपटातील ’तारीख पे तारीख, तारीख पे तारीख’ हा संवाद खूप गाजला. सनी देओल या जबरदस्त अभिनेत्याने आपल्या भारदस्त आवाजात हा संवाद म्हटला तेव्हा प्रेक्षक त्या भूमिकेच्या प्रेमात पडले. हिंदी चित्रपटात कोर्टाची अनेक दृश्ये आपण पाहिलेली असतात.. मात्र ती सगळी दृश्ये अतिरंजित असतात. प्रत्यक्ष आयुष्यात असं काही घडत नाही. कोणताही वकील सनी देओल बनून येणार नाही. (City Civil Court)

वकीलामध्ये विशिष्ट गुण असावे लागतात. तरंच तो तुम्हाला जिंकून देऊ शकतो. चला तर आपण या लेखातून जाणून घेऊया, मुंबईच्या सिटी सिव्हिल कोर्ट केससाठी योग्य वकील कसा निवडायचा? (How to Choose the Right Lawyer for Your City Civil Court Mumbai Case?)

(हेही वाचा – Ramdara Temple : पुण्यामध्ये आहे प्रभू श्रीरामांचं सुंदर देऊळ; रामदरा मंदिर)

सिटी लॉयर म्हणजेच दिवाणी वकील, ज्याला आपण लिटिगेटर म्हणतो. हे वकील गुन्हेगारी पार्श्वभूमी व्यतिरिक्त दिवाणी खटले हाताळण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. दिवाणी वकील सामान्यतः वैयक्तिक नुकसान, कौटुंबिक संबंध, रोजगार आणि रिअल इस्टेट यासंबंधी कायदेशीर विवाद हाताळतात.

ते सिटी सिव्हिल कोर्ट मुंबई (city civil court mumbai) येथे सरकारी तसेच व्यावसायिक संस्थांसोबतही काम करू शकतात. दिवाणी वकीलाला (civil lawyer) दोन पक्षांमधील कायदेशीर विवादाच्या सर्व गैर-गुन्हेगारी पैलू माहित असायला हवेत. नागरी विवादामध्ये सामान्यतः व्यक्तीशः, वैयक्तिक संबंध आणि मालमत्ता विवाद यांचा संबंध असतो. दिवाणी वकील दोन पक्षांमधील संघर्ष आणि विवाद सोडवण्याचा प्रयत्न करतो. (City Civil Court)

अनेक दिवाणी प्रकरणांमध्ये, कोणीही त्यांच्याकडे मालमत्तेच्या मालकीचा दावा किंवा मालमत्तेमध्ये झालेल्या नुकसानीसाठी भरपाई मागू शकतो. दिवाणी वकील बदनामी, शिक्षणाचा अधिकार, मालमत्तेची मालकी, कॉपीराइट उल्लंघन, घटस्फोट, मुलांचा ताबा आणि विम्याचे दावे यासारख्या विवादांसाठी गैर-गुन्हेगारी खटले घेऊ शकतात.

(हेही वाचा – Andheri Gokhale bridge : केवळ १४ महिन्यांत उड्डाणपूल उभारण्याची महापालिकेने केली किमया)

वकीलीची पदवी

कोणत्याही वकिलांकडे LLB (बॅचलर ऑफ लेजिस्लेटिव्ह लॉ), BA LLB (बॅचलर ऑफ आर्ट्स अँड लेजिस्लेटिव्ह लॉ) आणि BCom LLB (बॅचलर ऑफ कॉमर्स ऍंड लेजिस्लेटिव्ह लॉ) ही पदवी असायला हवी.

संभाषण कौशल्य

न्यायालयात ’बोलणं’ हा महत्वाचा गुण असतो. तसेच आपल्या क्लायंटसोबत आणि इतर लोकांसोबत व्यवस्थित बोलून केस लढवायची असते. न्यायालयात न्यायाधीशांसमोर चांगला युक्तिवाद करणे, कार्यक्षमतेने आणि प्रभावीपणे बोलणे हे एक कौशल्य आहे. त्यामुळे वकीलाकडे संभाषण कौशल्य असायलाच हवं.

बार काउंसिल सर्टिफिकेट

वकील होण्यासाठी आणि न्यायालयीन प्रॅक्टिस सुरू करण्यासाठी, वकिलांना त्या विशिष्ट अधिकारक्षेत्रासाठी बार काउंसिलची परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. तर तुमच्या वकीलाकडे हे सर्टिफिकेट आहे याची खात्री करुन घ्या. (City Civil Court)

विश्लेषणात्मक कौशल्य

कायदेशीर व्यवसायात असणार्‍या व्यक्तीकडे विश्लेषणात्मक गुण असायलाच हवा. एखादी चुकीची माहिती कुणी दिली असेल तर त्या गुणाद्वारे विश्लेषण करुन तसे मुद्दे मांडता येतात आणि कोणती माहिती कोर्टात वापरावी किंवा कोणती वापरु नये हे देखील ठरवता येते. तसेच घटनांचे विश्लेषणही करता येते.

कामाचा अनुभव

तुमच्या वकीलाकडे दिवाणी किंवा कायदेशीर फर्ममध्ये कामाचा अनुभव असायला हवा. तुमचा वकील कोणत्या गोष्टीत विशेषज्ञ आहे हे देखील जाणून घ्या. तुमची समस्या तो व्यवस्थित हाताळू शकतो की नाही याचा अंदाज तुम्हाला लावता येईल. वकिलांना कायदेशीर कार्यवाहीबाबत बरेच व्यावहारिक ज्ञान असणे आवश्यक असते. (City Civil Court)

संशोधन करण्याची वृत्ती

एका चांगल्या वकीलाकडे एक महत्त्वाचे कौशल्य असलेच पाहिजे, ते म्हणजे संशोधन करण्याची क्षमता. संशोधन करायचे म्हणजे वर्षानुवर्षे घालवायचे नाहीत. तर त्वरित शोध मोहीम राबवून त्यातून माहिती गोळा करता आली पाहिजे. तरंच तुमचा वकील तुमचे हित साधू शकतो.

(हेही वाचा – डिव्हाईन कॉमेडी नावाच्या पुस्तकाचे भाषांतर करणारे अमेरिकेतील पहिले साहित्यिक Henry Longfellow)

निर्णय घेण्याची क्षमता

वकीलाकडे आणखी एक महत्वाचा गुण असायला हवा. निर्णय घेण्याची क्षमता अत्यंत महत्वाची असते. तर्कसंगत पद्धतीने घटनेच्या आकलनावर आधारित, वकील त्याला दिलेल्या माहितीच्या आधारे आणि त्याच्या मागील अनुभवावर आधारित निष्कर्ष काढू शकतात. निर्णय घेण्याचे कौशल्य म्हणजे परिस्थिती आणि घटनांचे विश्लेषण केल्यानंतर निर्णय घेण्याची क्षमता…

मन वळवण्याची कुशलता

बर्‍याचदा असे प्रसंग उभे राहतात जिथे मन वळवून वादावर पडता टाकला जातो. अनेक प्रसंगी, विशेषत: कौटुंबिक किंवा व्यावसायिक विवादांमध्ये, दोन विरुद्ध पक्षांचे वकील त्यांच्यातील समस्या सामंजस्याने सोडवतात. तसेच इतर प्रकरणांतही चांगली वाटाघाटी केल्यास क्लायंटला फायदाच होतो. (City Civil Court)

तर वाचकांनो, आम्ही वर जे गुण सांगितले आहेत, ते तुमच्या वकीलाकडे असतील तर तुमची केस योग्य व्यक्तीकडे आहे असं समजा. हा लेख तुम्हाला कसा वाटला, हे अवश्य सांगा.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.