राज्याचे अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंख्येलाच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. ज्यामुळे खळबळ उडाली. त्यानंतर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपने सर्व आमदारांची बैठक घेतली. ज्यामध्ये याबाबत रणनीती ठरवण्यात आली आहे. मराठा आरक्षणाबाबत संयमाची भूमिका घ्या, पण होणाऱ्या आरोपांना लागलीच प्रत्युत्तर द्या, असे ठरवण्यात आले असल्याचे समजते.
भाजपच्या मराठा आमदारांना सूचना
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी फडणवीसांवर आरोप केल्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड, नितेश राणे यांच्याशिवाय पक्षातील एकाही मोठ्या नेत्याने जरांगे पाटील यांच्या आरोपाला जोरदार प्रत्युत्तर दिले नाही. जरांगे पाटील यांच्याविरोधात भाजपचे मराठा मंत्री आणि आमदार रोखठोक भूमिका घेत नसल्याची माहिती उपस्थित असलेल्या एका आमदाराने दिली. राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील यांच्यासह मराठा समाजाच्या मंत्र्यांनाही जरांगे पाटील यांच्या खोट्या आरोपांना उत्तर देण्याच्या सूचना दिल्याचे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचा Andheri Gokhale bridge : केवळ १४ महिन्यांत उड्डाणपूल उभारण्याची महापालिकेने केली किमया)
मुख्यमंत्रीही संतापले
लिमिटच्या बाहेर गेले की कार्यक्रमच करतो मी. तो सामाजिक कार्यकर्ता होता तोपर्यंत ठीक होतं.’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल केलेली ही टिप्पणी समाजमाध्यमांवर व्हायरल झाली आहे. यावरून राज्य सरकार आता जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची कोणतीही मागणी मान्य करण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानभवनात मुख्यमंत्री शिंदे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची समोरासमोर भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये विनोदी स्वरात संवाद सुरू झाला. ‘हे काय चाललंय? मला सांगा,तुम्ही त्याला वाढवलं ना?’ असा सवाल पटोले यांनी जरांगे यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत मुख्यमंत्री शिंदे यांना केला. तेव्हा मुख्यमंत्री शिंदे यांनी वरील वक्तव्य केले. माध्यमांनी रेकॉर्ड केलेले हे संभाषण व्हायरल झाले. अर्थसंकल्पाच्या पहिल्या दिवशी शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनीही जरांगे पाटील यांच्यावर उघड टीका केली.
Join Our WhatsApp Community