पश्चिम बंगालमधील संदेशखली (Sandeshkhali Violence) गावात महिलांवर अनेक वर्षे अत्याचार करणाऱ्या टीएमसीचा नेता शाहजहान शेख याच्या विरोधात आता महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. त्याच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत, मात्र तो सध्या फरार आहे. त्याला ममता बॅनर्जी यांच्या सरकारचा राजाश्रय प्राप्त असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने शाहजहानला का अटक करत नाही, अशी विचारणा करून सरकारला चांगलेच सुनावले होते. या प्रकरणी सोमवारी पुन्हा सुनावणी झाली तेव्हाही न्यायालयाने सरकारला पुन्हा फटकारले, त्यावेळी ममता बॅनर्जी सरकारने ७ दिवसांत त्याला अटक करू, असे सांगितले.
(हेही वाचा Manoj Jarange Patil यांच्या टीकेनंतर भाजपचे आमदार झाले आक्रमक; प्रसाद लाड यांनी केले सूचक ट्विट)
४ वर्षांपूर्वीच पोलिसांना माहिती देऊनही कारवाई नाही
मुख्य न्यायमूर्ती टीएस शिवज्ञानम यांनी, पोलिसांनी कोणत्याही परिस्थितीत पुढील सुनावणीवेळी शाहजहानला न्यायालयात सादर करावे. त्याच्या अटकेला कोणतीही स्थगिती नाही, असे म्हटले. संदेशखलीत (Sandeshkhali Violence) अत्याचाराच्या घटनांची माहिती पोलिसांना ४ वर्षापूर्वी देण्यात आली होती, याबद्दल न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले, लैंगिक अत्याचाराच्या ४२ तक्रारी आहेत, मात्र आरोप निश्चित करण्यासाठी ४ वर्ष लागले, न्यायालयाने आदेश दिले को, ४ मार्चच्या सुनावणीवेळी सोबीआय, इडी, शाहजहान शेख, पोलिस अधीक्षक आणि बंगाल सरकारच्या प्रतिनिधीने न्यायालयात हजर राहावे. उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर तृणमूल प्रवक्ते कुणाल घोष यांनी सांगितले की, पोलिस ७ दिवसांत शाहजहान शेखला अटक करतील, दरम्यान, पोलिसांनी संदेशखाली ठाण्यात शाहजहांविरुद्ध नव्याने एफआयआर दाखल केलं आहे. त्याच्यावर तीन गुन्हे दाखल झाले आहेत.
Join Our WhatsApp Community