Shiv Sena : समाजवादी पक्षात फूट, गोवंडीतील माजी नगरसेवक शिवसेनेत

गोवंडी भागातील प्रभाग क्रमांक १३९ समाजवादी पक्षाचे अख्तर कुरेशी यांनी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अरुण कांबळे यांचा सुमारे ८०० मतांनी पराभव केला होता.

1042
Shiv Sena : समाजवादी पक्षात फूट, गोवंडीतील माजी नगरसेवक शिवसेनेत

शिवसेना पक्षात उबाठा शिवसेनेसह (Shiv Sena) काँग्रेस पक्षातील पदाधिकारी आणि माजी नगरसेवक प्रवेश करत असतानाच आता समाजवादी पक्षातील नगरसेवकांनीही या पक्षात प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. गोवंडी येथील समाजवादी पक्षाचे प्रभाग क्रमांक १३९मधील माजी नगरसेवक अख्तर कुरेशी यांनी शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत भगवा झेंडा हाती घेतला आहे. शिवसेना पक्षामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतील अल्पसंख्यांक समाजातील लोकप्रतिनिधी तथा माजी नगरसेवक यांनी विश्वास दाखवण्यास सुरुवात केली असून आता समाजवादी पक्षातील माजी नगरसेवक अख्तर कुरेशी यांनीही या पक्षात प्रवेश केल्यामुळे मुस्लिम समाजाचा या पक्षाला पाठिंबा मिळण्यास सुरुवात झाली आहे असे दिसून येत आहे. (Shiv Sena)

New Project 2024 02 27T140359.626

समाजवादी पक्षाचे माजी नगरसेवक अख्तर कुरेशी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या वर्षा या निवासस्थानी येऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सन २०१७ च्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत समाजवादी पक्षाचे सहा नगरसेवक निवडून आले होते. या सहापैकी पाच नगरसेवक हे महापालिकेच्या एम पूर्व अर्थात गोवंडी, देवनार शिवाजी नगर या भागातील होते. (Shiv Sena)

(हेही वाचा – BJP ने सोडचिठ्ठी दिल्यावर संविधानाची आठवण? वंचितचा Shiv Sena UBT ला सवाल)

या गोवंडी भागातील प्रभाग क्रमांक १३९ समाजवादी पक्षाचे अख्तर कुरेशी यांनी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अरुण कांबळे यांचा सुमारे ८०० मतांनी पराभव केला होता. कुरेशी यांना ४७८२ मते मिळाली होती. तर कांबळे ३९०० मते मिळाली होती, आणि तिसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे उमेदवार सुरेश पाटील हे होते. त्यांना ३७०० मते मिळाली होती. त्यामुळे या मतदारसंघात मुस्लिम, दलित या मतांबरोबरच शिवसेनेला (Shiv Sena) मानणारे मतदार असून कुरेशी यांच्या माध्यमातून या मतदार संघात शिवसेनेचा धनुष्यबाण चालला जाऊ शकेल असा अनुमान वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी काँगेस पक्षातील माजी नगरसेवक बब्बु खान, वाजिद कुरेशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील रेश्मा बानो व तिचे पती वकिल शेख, नाजिया सोफिया आदी मुस्लिम माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. (Shiv Sena)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.