Uddhav Thackeray : पक्ष निधीतून काढले 50 कोटी रुपये; उद्धव ठाकरेंची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू

384
Uddhav Thackeray : पक्ष निधीतून काढले 50 कोटी रुपये; उद्धव ठाकरेंची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू
Uddhav Thackeray : पक्ष निधीतून काढले 50 कोटी रुपये; उद्धव ठाकरेंची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOW) वतीने उबाठा गटाविरुद्ध पक्ष निधीतून 50 कोटी रुपये काढल्याच्या आरोपांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने आयकर विभागाला पत्र लिहून उबाठा गटाचा कर कोण भरत आहे ? याची माहिती मागितली आहे. (Uddhav Thackeray)

(हेही वाचा – Ind vs Eng 4th Test : यशस्वी जयस्वालने विराटच्या ‘या’ विक्रमाशी केली बरोबरी)

निधी खाते कोण चालवते?

शिवसेनेच्या (Shiv Sena) पक्ष निधी प्रकरणाची चौकशी आता आर्थिक गुन्हे शाखेकडून होणार आहे. या चौकशीदरम्यान शिवसेना पक्षाचे निधी खाते कोण चालवते? आणि ज्या बँक खात्यातून पैसे काढण्यात आले, त्या खात्यातून पैसे कोणी काढले याची माहितीही मागवण्यात आली आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाकडून फेब्रुवारी 2023 मध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचे घोषित केले होते आणि त्यांना धनुष्यबाण हे चिन्हही देण्यात आले होते.

उबाठा गटाकडून पॅन आणि टॅन तपशीलांचा गैरवापर

निवडणूक आयोगाने शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून घोषित केल्यानंतरही शिवसेना उद्धव ठाकरे गटाने पक्ष निधीतून 50 कोटी रुपये काढल्याचा आरोप शिवसेना एकनाथ शिंदे गटाने केला आहे. शिंदे गटाने मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेऊन उबाठा गटाच्या विरोधात फसवणूक आणि बनावटगिरी केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. उबाठा गट पक्षाच्या पॅन आणि टॅन तपशीलांचा गैरवापर करत आहे आणि शिवसेनेचे TDS आणि आयकर रिटर्न फसवणूक करत आहे, असे या तक्रारीत म्हटले आहे.

उबाठा गट ही खरी शिवसेना नसून ते पक्ष निधी काढू शकत नाहीत. तरीही त्यांनी पक्ष निधीतून 50 कोटी रुपये कसे काढले? असा प्रश्न शिंदे गटाकडून उपस्थित करण्यात आला आहे. (Uddhav Thackeray )

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.