पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मंगळवारी केरळमध्ये इस्रोच्या ३ प्रमुख तांत्रिक विभागांचं उद्घाटन केलं. यावेळी मोदींनी तिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचा दौरा केला. मोदींनी ‘गगजनाय मानवी अंतराळ उड्डाण’ कार्यक्रमाच्या प्रगतीचा आढावा घेतला तसेच गगनयान मोहिमेशी संबंधित अंतराळवीरांची भेट घेतली.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गगनयान मोहिमेतील अंतराळवीरांच्या नावांचीही घोषणा केली. ग्रुप कॅप्टन प्रशांत बालाकृष्णन नायर, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन् आणि विंग कमांडर शुभांशू शुक्ला हे गगनयान मोहिमेसाठी निवडलेले अंतराळवीर आहेत.
(हेही पहा – Gautam Adani: आशियातील सर्वात मोठ्या शस्त्रनिर्मितीच्या कारखान्याचे उद्घाटन )
आजची भावी पिढी भाग्यवान-पंतप्रधानांचं प्रतिपादन
‘आजची भावी पिढी भाग्यवान आहे. ही वेळही आपलीच आहे.’, असे उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यांनी व्हिएसएससीमधील ट्राइयोसोनिक विंड टनेल, तामिळनाडूतील महेंद्र गिरीमधील इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्समधील सेमी क्रायोजेनिक इंटीग्रेटेड इंजिनासंबंधी विभाग आणि सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रामधील पीएसएललव्ही एकीकरण विभागाचही यावेळी उद्घाटन केलं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community