कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी दादरच्या गुरुद्वारात धान्यासह ऑक्सिजनचे मोफत वाटप 

कोरोनाच्या पहिल्या लाटेत मागील वर्षी गुरुद्वारातर्फे साडेबारा हजार रेशन किट्स वाटण्यात आले,  त्याबरोबरच दहा लाखांहून जास्त असंघटित कामगार, मजदूर व गरजूंना जेवण देण्यात आले होते.

123

कोरोना काळात वेगाने वाढणार्‍या संसर्गामुळे रुग्णालयात बेड, औषधे आणि ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. अशा वेळी दादर येथील श्री गुरू सिंग सभा गुरुद्वारा समितीने कोरोना संक्रमित रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. गरजूंसाठी धान्यवाटप आणि ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था करत आहे.

छोटे, जम्बो असे 80 ऑक्सिजन सिलिंडरचे वितरण

ऑक्सिजन अभावी रुग्णांचे हाल होऊ नयेत, रुग्णांचे आरोग्य जपता यावे, त्यांना वेळेत ऑक्सिजन मिळावे यासाठी दादर  पूर्व येथील श्री गुरू सिंग सभा गुरुद्वारा समितीने पुढाकार घेतला असून विनामूल्य ऑक्सिजन सेवा सुरु केली आहे.  त्यामुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळत आहे. ऑक्सिजन अभावी कोणाचे हाल होऊ नयेत, त्यांना ऑक्सिजन वेळेत मिळावेत यासाठी सेवा पुरवत असताना दुसरीकडे कोणी उपाशी राहू नये, म्हणून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा देखील गुरुद्वाराच्या वतीने करण्यात येत आहे. गरजूंना वेळेत ऑक्सिजन मिळावा यासाठी छोटे आणि जम्बो असे एकूण 80 ऑक्सिजन सिलिंडर खरेदी केले असून अजूनही ऑक्सिजन सिलिंडर मागविले असल्याचे श्री गुरु सिंग सभा गुरुद्वाराचे अध्यक्ष रघबीर सिंग गिल यांनी सांगितले.

(हेही वाचा : संजय राऊतांकडून अहिल्याबाई होळकरांचा अवमान! वंशज भूषणसिंह राजेंनी खडसावले! )

100 हून अधिक गरजूंना ऑक्सिजन सेवा पुरवली!

आतापर्यंत 100 हून अधिक गरजूंना ऑक्सिजन सेवा पुरविण्यात आल्याचे गुरुद्वाराचे सचिव बलबीर सिंग बाथ यांनी सांगितले. गेली 100 वर्षांची परंपरा असलेल्या दादर पूर्व नायगाव येथील सिंग सभा गुरुद्वाराने कोरोना पर्वात लाखो गरजूंना जीवनवश्यक वस्तूंचे वाटप करून मोलाची कामगिरी बजाविली, आजही त्यांचे हे कार्य अविरतपणे सुरु असून गुरुद्वारात येणाऱ्या प्रत्येक गरजूला आपुलकीची आदराची वागणूक मिळत आहे. आज रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे, मात्र गुरुद्वारात मिळणाऱ्या या विनामूल्य सेवेमुळे दिलासा मिळाला असल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले.

New Project 4 7

रेशन रेशन वाटप

गुरुद्वारातर्फे फक्त ऑक्सिजन नाही, तर रेशनचे वाटप देखील गरजूंना वाटप करण्यात येत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत मागील वर्षी गुरुद्वारातर्फे साडेबारा हजार रेशन किट्स वाटण्यात आले,  त्याबरोबरच दहा लाखांहून जास्त असंघटित कामगार, मजदूर व गरजूंना जेवण देण्यात आले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.