Ind vs Eng 4th Test : ‘निर्दयी क्रिकेट म्हणजे नेमकं काय?’ असा प्रश्न बेन स्टोक्सने का विचारला?

चौथ्या कसोटीत इंग्लिश संघ चांगलाच खेळला, निर्दयी क्रिकेटच्या सल्ल्यावर स्टोक्सची प्रतिक्रिया

228
Ind vs Eng 4th Test : ‘निर्दयी क्रिकेट म्हणजे नेमकं काय?’ असा प्रश्न बेन स्टोक्सने का विचारला?
Ind vs Eng 4th Test : ‘निर्दयी क्रिकेट म्हणजे नेमकं काय?’ असा प्रश्न बेन स्टोक्सने का विचारला?
  • ऋजुता लुकतुके

दोन वर्षांपूर्वी इंग्लिश क्रिकेट संघाने मुख्य प्रशिक्षक मॅक्युलम यांच्या नेतृत्वाखाली बॅझ-बॉल क्रिकेटला सुरुवात केली. आणि तेव्हापासून त्यांनी एकही मालिका गमावली नव्हती, अगदी ॲशेसही नाही. त्यामुळे भारतातील मालिका गमावण्याकडे इंग्लंडमधील जाणकार वेगळ्या दृष्टीने पाहत आहेत. इंग्लिश संघाने भारतात थोडं जास्त निर्दयी क्रिकेट खेळायला हवं होतं, अशी काहींची प्रतिक्रिया होती. ‘बॅझ-बॉल क्रिकेटमध्ये लवचिकता नाही आणि आवश्यक खोली नाही,‘ अशी टीका इंग्लंडमध्ये सुरू झाली आहे. त्यावर इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सने (Captain Ben Stokes) शांतपणे उत्तर दिलं. ‘निर्दयी क्रिकेट नेमकं काय असतं? ते कसं दिसतं?’ असं तो म्हणाला. (Ind vs Eng 4th Test)

‘सगळेच सामना जिंकण्यासाठी खेळतात. जिंकू शकत नाहीत, तेव्हा लोक म्हणतात हे निर्दयी नाहीत. जिंकतात तेव्हा म्हणतात, निर्दयी आहेत,’ असं स्टोक्सचं यावर उत्तर होतं. जो रुटकडून कप्तानीची सूत्र हातात घेतल्यावर इंग्लिश संघाने न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानवर मालिका विजय मिळवले. आणि ॲशेसमध्येही ऑस्ट्रेलियाबरोबर इंग्लंडने २-२ अशी बरोबरी साधली. (Ind vs Eng 4th Test)

(हेही वाचा – Shiv Sena : गोरेगावमध्ये उद्धव ठाकरे यांना अजून एक धक्का; वायकर, प्रभू यांच्या जवळचे सहकारी शिवसेनेत)

‘आम्ही प्रत्येकच सामना जिंकण्यासाठी खेळतो. मालिकाही जिंकण्याच्याच निर्धाराने खेळतो. पण, नेहमीच तसं होतं नाही. आम्ही गमावलेली ही पहिलीच मालिका आहे. पण, आणखी अनेक मालिका आम्ही खेळणार आहोत. आणि जिंकणार आहोत,’ असं शेवटी बेन स्टोक्स म्हणाला. (Ind vs Eng 4th Test)

जो रुट (Joe Root) ज्या पद्धतीने पुन्हा फॉर्ममध्ये आला आणि टॉम हार्टलीने तसंच बशीरने मिळालेल्या संधीचं सोनं केलं, या गोष्टींचं स्टोक्सने कौतुक केलं. आणि भारतीय विजयाचं श्रेय फिरकीपटूंना दिलं.

‘अश्विन, कुलदीप आणि जाडेजा या फिरकीपटूंना फिरकीला मदत करणाऱ्या खेळपट्टीवर खेळणं हे खूपच आव्हानात्मक होतं,’ असं बेन स्टोक्स या मालिकेविषयी बोलताना म्हणाला.

इंग्लिश संघ आता धरमशाला कसोटीपूर्वी बंगळुरू आणि चंदिगडमध्ये वेळ घालवणार आहे. तर संघासाठी एकमेव काळजीची गोष्ट म्हणजे मुख्य गोलंदाज जिमी अँडरसनची पाठ थोडी दुखावली आहे. पाचवा कसोटी सामना ७ मार्चपासून धरमशालाला होणार आहे. (Ind vs Eng 4th Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.