Rashmi Shukla : पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांची मुदतवाढ

Rashmi Shukla Extension : जानेवारी 2024 मध्ये आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आणि महानिरिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या निर्णयानुसार त्या जानेवारी 2026 पर्यंत राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर राहणार आहेत.

276
Rashmi Shukla प्रकरणातील याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयाने का सुनावले खडेबोल?

राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना यांना दोन वर्षांची मुदतवाढ मिळाली आहे. रश्मी शुक्ला या जूनमध्ये सेवानिवृत्त होणार होत्या. आता त्यांना दोन वर्षांचा कार्यकाळ वाढवून देण्यात आला आहे. रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) आता जानेवारी 2026 पर्यंत राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर रहाणार आहेत. सध्या त्यांचा चार महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक आहे.

(हेही वाचा – Slaughter House : पंचगंगेचे प्रदूषण करणारा कत्तलखाना 15 दिवसांत बंद झाला नाही, तर नागरिक बंद पाडतील; मोर्चाद्वारे हिंदुत्वनिष्ठांचा इशारा)

फोन टॅपिंग प्रकरणी चर्चेत

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या फोन टॅपिंग प्रकरणी चर्चेत आल्या होत्या. फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख असतांना विरोधी नेत्यांचे फोन बेकायदेशीर रेकॉर्ड केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. न्यायालयाने त्यांना क्लिन चिट दिली आहे.

सध्या राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांची वर्णी लागली. जानेवारी 2024 मध्ये आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आणि महानिरिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या निर्णयानुसार त्या जानेवारी 2026 पर्यंत राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर राहणार आहेत. (Maharashtra News)

रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ वाढवून देण्याबाबत सकारात्मक होते. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने त्यांचा कार्यकाळ 2 वर्षांनी वाढवल्याच्या संदर्भात नोटिफिकेशन काढून माहिती दिली आहे. (Rashmi Shukla)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.