विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या तृतीय पंथीयांना न्यायायलयातील प्रक्रियेचा एक भाग होता यावे, म्हणून त्यांना आता न्यायादानदेखील करता येणार आहे. आगामी लोकअदालतीत (Lok Adalat) असलेल्या १३ पॅनेलमध्ये तृतीय पंथीयांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांनाही न्यायदानाची प्रक्रिया समजून घेत पक्षकारांमधील वाद तडजोडीतून मिटवता येणार आहेत.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून त्यांची नुकतीच पॅनेल सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उच्चशिक्षित असलेले हे तृतीयपंथी त्यांच्या वर्गासाठी सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. त्यांचे शिक्षण आणि ते करत असलेले काम या निकषांवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी दिली.
(हेही वाचा – Manoj Jarange: अनवधानाने ते झालं असेल… मी माझे शब्द मागे घेतो; जरांगेंनी मागितली देवेंद्र फडणवीसांची माफी )
जिल्ह्यात पहिल्यांदाच तृतीय पंथीयांचा लोक अदालतीत सहभाग
जिल्ह्यात पहिल्यांदाच १३ तृतीय पंथीयांना लोक अदालतीत पॅनेल सदस्य म्हणून सहभागी करून घेण्यात येत आहे. तृतीय पंथीयांना समाजात मानाचे स्थान आहे. त्यामुळे त्यांचा न्यायालयीन प्रक्रियेत सहभाग वाढावा म्हणून आम्ही ही निवड करीत आहोत. निवडीची प्रक्रिया तंतोतंत पाळत त्यांना ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यांच्याकडे मोटार वाहन कायद्यासंदर्भातील प्रकरणे निकालासाठी दिली जाणार आहेत. त्यामुळे त्यांनादेखील न्यायदान करणे सोपे होणार आहे.
समान हक्क मिळण्याचे संवंधानाची उद्दिष्ट्ये साध्य
प्रमुख जिल्हा न्यायाधीश व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तृतीयपंथीयांना समाजाच्या प्रवाहामध्ये समावून घेणे. त्यांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात. तसेच सर्वांना समान हक्क मिळण्याचे संवंधानाची उद्दिष्ट्ये साध्य व्हावीत, यासाठी तृतीयपंथीयांना ही संधी उपलब्ध करून दिली आहे, असे सोनल पाटील, सचिव, विधी सेवा प्राधिकरण यांनी सांगितले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community