Girish Chandra Ghosh: बंगालमध्ये नाट्याचा सुवर्ण काळ निर्माण करणारे प्रसिद्ध नाटककार !

नाट्य क्षेत्रात प्रचंड नाव गाजवणार्‍या गिरीश घोष यांचा जन्म २८ फेब्रुवारी १८४४ रोजी कोलकोतातील बागबाझार येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नीलकमल आणि आईचे नाव रायमणी. त्यांनी आपले प्रारंभिक शिक्षण ओरिएंटल सेमिनरीमध्ये घेतले आणि नंतर हेअर स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले.

309
Girish Chandra Ghosh: बंगालमध्ये नाट्याचा सुवर्ण काळ निर्माण करणारे प्रसिद्ध नाटककार !
Girish Chandra Ghosh: बंगालमध्ये नाट्याचा सुवर्ण काळ निर्माण करणारे प्रसिद्ध नाटककार !
गिरीश चंद्र घोष (Girish Chandra Ghosh) हे प्रायोगिक रंगभूमीवरील एक प्रमुख कलाकार होते, बागबाझार या नाट्यसंस्थेत ते काम करायचे. तिथे अर्धेन्दू शेखर मुस्तफी त्या काळचे आणखी एक प्रचलित नट त्यांचे सहकारी होते. या दोघांनी मिळून प्रसिद्ध नाटककार दीनबंधू मित्र यांनी लिहिलेले ’सदाबर एकादशी’ हा नाट्यप्रयोग सादर केला, जो खूप लोकप्रिय ठरला.
१८७१ मध्ये या बागबाजार थिएटरचे नाव बदलून नॅशनल थिएटर करण्यात आले. पुढे गिरीश घोष यांनी नॅशनल थिएटर सोडले आणि १८७३ मध्ये ग्रेट नॅशनल थिएटरची स्थापना केली. १८७७ मध्ये गिरीश यांचे पहिले ‘आगमणी’ नाटक या थिएटरद्वारे प्रदर्शित करण्यात आले. नंतर त्यांनी मिनर्व्हा थिएटरमध्ये काम केले आणि पुढे ते व्यवस्थापक झाले. १८८३ मध्ये गिरीश यांनी स्वतःच्या पैशाने स्टार थिएटर सुरु केले. तिथे ते दिग्दर्शन करु लागले.
२१ जुलै १८८३ रोजी गिरीश चंद्र घोष यांनी दक्षा जगना या नाटकाची निर्मिती स्टार थिएटरद्वारे केली. बिनोदिनी दासी यांच्यासोबत त्यांनी चैतन्यलीला हे नाटक २० सप्टेंबर १८८४ रोजी प्रदर्शित केले.
वाचकहो, नाट्य क्षेत्रात प्रचंड नाव गाजवणार्‍या गिरीश घोष यांचा जन्म २८ फेब्रुवारी १८४४ रोजी कोलकोतातील बागबाझार येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नीलकमल आणि आईचे नाव रायमणी. त्यांनी आपले प्रारंभिक शिक्षण ओरिएंटल सेमिनरीमध्ये घेतले आणि नंतर हेअर स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले. १८६२ मध्ये गिरीश यांनी एका ब्रिटीश कंपनीमध्ये बुककीपिंगमध्ये शिकाऊ पदवी घेतली. याच सुमारास त्यांची ओळख ईश्वरचंद्र गुप्ता यांच्याशी झाली. याच काळात त्यांनी नाटके, गाणी आणि कविता लिहिण्यास सुरुवात केली.
घोष यांनी सुमारे ८६ नाटके लिहिली आहेत. त्यापैकी बहुतेक पुराण, रामायण आणि महाभारतातील कथांवर आधारित होती. बुद्धदेव चरित, पूर्ण चंद्र, नसीराम, कलापहार, अशोक, शंकराचार्य, चैतन्यलीला, निमाई संन्यास, रूप-सनातन, विलवमंगल, प्रल्हाद चरित ही त्यांची प्रसिद्ध नाटके आहेत. त्यांची बहुतेक नाटके कलकत्ता येथील स्टार थिएटरमध्ये सादर झाली. गिरीश यांनी १८९३ मध्ये शेक्सपियरच्या मॅकबेथ नाटकाचा बांगला भाषेत अनुवाद केला. त्यांना बंगाली नाट्याक्षेत्राच्या सुवर्ण काळाचे प्रणेते मानले जाते.
हेही पहा – 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.