- ऋजुता लुकतुके
मालिकेत १-३ असा पिछाडीवर पडलेला इंग्लिश संघ पाचव्या कसोटीपूर्वीची आठवडाभराची सुटी चंदिगड आणि बंगळुरूत घालवणार आहे. पुढील कसोटी ७ मार्चला हिमाचलप्रदेशमध्ये धरमशाला इथं होणार आहे. तिसऱ्या कसोटीपूर्वी मिळालेली मोठी सुटी बेन स्टोक्सच्या संघाने आबूधाबीत घालवली होती. आणि या दौऱ्याची तयारीही त्यांनी दीड महिना आबूधाबीत राहूनच केली होती. (Ind vs Eng 4th Test)
पण, यावेळी संघातील खेळाडूंनीच भारतात राहण्याला पसंती दिली आहे. त्यांना भारतात चांगली हवा असलेल्या ठिकाणी वेळ घालवायचा आहे. (Ind vs Eng 4th Test)
England players to spend free time in Bengaluru and Chandigarh before Dharamsala Test#BenStokes #INDvsENG #EnglandCricket #Bazball #Dharamshala https://t.co/jaNyNxJ5eE
— NewsDrum (@thenewsdrum) February 26, 2024
(हेही वाचा – Marathi Bhasha Din : मराठीला आज ना उद्या अभिजात भाषेचा दर्जा नक्कीच मिळेल)
भारतीय संघाची मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी
‘खेळाडूंनीच आधी चंदिगड आणि मग बंगळुरूमध्ये ३-३ दिवस घालवण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत खेळाडूंसाठी सराव सत्र आयोजित करण्यात येणार नाही. पण, पाचव्या कसोटीपूर्वी ३ दिवस आधी म्हणजे ४ तारखेला इंग्लिश संघ धरमशालाला पोहोचेल. आणि तिथे सराव सुरू करेल,’ असं इंग्लिश क्रिकेट बोर्डातील सूत्रांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं. (Ind vs Eng 4th Test)
या मालिकेत इंग्लिश संघाने हैद्राबादमधील पहिला कसोटी सामना २७ धावांनी जिंकून १-० अशी आघाडी घेतली होती. पण, त्यानंतर विशाखापट्टणम, राजकोट आणि आता रांचीतही दणदणीत विजय मिळवून भारतीय संघाने मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. (Ind vs Eng 4th Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community