Shreyas Iyer : पुन्हा तंदुरुस्त झालेला श्रेयस अय्यर रणजीच्या उपांत्य फेरीत खेळणार

मुंबईचा उपउपांत्य फेरीचा सामना न खेळल्यामुळे श्रेयसला टीकेचा धनी व्हावं लागलं होतं. 

161
Shreyas Iyer : पुन्हा तंदुरुस्त झालेला श्रेयस अय्यर रणजीच्या उपांत्य फेरीत खेळणार
  • ऋजुता लुकतुके

पाठदुखीमुळे त्रस्त असलेला भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) मुंबईकडून रणजी करंडकाची उपान्त्य फेरी खेळणार आहे. मुंबईसाठी हा मोठा दिलासा असेल. २ मार्चपासून मुंबईचा संघ बीकेसी मैदानात तामिळनाडू विरुद्ध दोन हात करणार आहे. आधीच्या उपउपांत्य फेरीत पाठदुखीचा त्रास जाणवत असल्यामुळे श्रेयसने माघार घेतली होती. (Shreyas Iyer)

‘श्रेयसने (Shreyas Iyer) मुंबई क्रिकेट असोसिएशनला ईमेल लिहून आपली उपलब्धता कळवली आहे. आणि तो २ तारखेचा सामना खेळणार आहे,’ असं मुंबई क्रिकेटमधील एका सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं आहे. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत पहिल्या दोन कसोटींत श्रेयसने ३५,१३, २७ आणि २९ धावा केल्या होत्या. चांगल्या सुरुवातीची फायदा उठवण्यात तो सातत्याने अपयशी ठरला. या मालिकेदरम्यानही तो पाठदुखीची तक्रार करत होता, असं समजतंय. (Shreyas Iyer)

(हेही वाचा – Mohammed Shami Surgery : मोहम्मद शामीच्या दुखऱ्या पायवर शस्त्रक्रिया)

तामिळनाडूकडून खेळणार हे खेळाडू

त्याचवेळी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी रणजी सामना खेळून स्पर्धात्मक सराव करण्याचा सल्ला दिलेला असताना त्याने रणजी खेळणं टाळल्याची चर्चाही सुरू होती. खेळाडू आयपीएलला महत्त्व देऊन त्यासाठी रणजी सामने खेळत असल्याची चिंता बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही अलीकडे व्यक्त केली होती. आणि रणजी सामने अनिवार्य करण्यासाठी नवी नियमावली आणण्याबद्दलही शाह यांनी भाष्य केलं होतं. भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही रांची कसोटीनंतर कडक शब्दात अशा वागणुकीविरोधात इशारा दिला होता. या दोघांचाही रोख मुख्यत्वे इशान किशन आणि श्रेयस (Shreyas Iyer) यांच्याकडे असल्याचीही चर्चा तेव्हा झाली. (Shreyas Iyer)

आता श्रेयसने (Shreyas Iyer) तरी हा प्रश्न सोडवला आहे. २ मार्चचा सामना तो खेळणार आहे. आणि आधीच्या सामन्याच्या वेळी त्याने पाठदुखीचंच कारण मुंबई असोसिएशनला कळवलं होतं. दरम्यान श्रेयसच्या गोटातून तो रणजी सामने खेळणं टाळत नसल्याचं सांगितलं जात आहे. ‘यापूर्वीही जानेवारी महिन्यात श्रेयस (Shreyas Iyer) आंध्रप्रदेश विरुद्ध खेळला आहे. तो रणजी सामने खेळणं का टाळेल? कसोटी क्रिकेटसाठी श्रेयस कटीबद्ध आहे. आणि म्हणूनच तो उपांत्य सामना खेळणार आहे,’ असं त्याच्या एका मित्राने नाव उघड न करण्याच्या बोलीवर पत्रकारांना सांगितलं आहे. दरम्यान, तामिळनाडूकडूनही वॉशिंग्टन सुंदर आणि साई सुदर्शन खेळणार आहेत. (Shreyas Iyer)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.