Legislative Assembly : …आणि सभागृहाचे कामकाज थांबले

विधानसभेच्या कामकाजात नाना पटोले यांनी भाग घेतला असतानाच माइक मधून खरखर आवाज येऊ लागल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंमतीत नाना तुमच्या माईकमध्ये वायरस तर गेला नाही ना असे म्हणत सभागृहात हास्यकल्लोळ उडवला.

208
Legislative Assembly : ...आणि सभागृहाचे कामकाज थांबले

ना सत्ताधाऱ्यांनी गोंधळ केला ना विरोधकांनी गोंधळ केला तरी देखील सभागृहाचे (Legislative Assembly) कामकाज थांबले. त्याला कारण देखील तसेच घडले. माईकच्या तांत्रिक अडचणीमुळे विधानसभेचे (Legislative Assembly) कामकाज सकाळी अकरा पस्तीस वाजताच्या दरम्यान अर्ध्या तासाकरिता थांबवण्यात आले. माईकमधून येणाऱ्या खरखर आवाजामुळे सभागृहाचे (Legislative Assembly) कामकाज थांबवण्याची बऱ्याच वर्षानंतर ही पहिलीच घटना असल्याचे देखील बोलले जात आहे. (Legislative Assembly)

(हेही वाचा – Shreyas Iyer : पुन्हा तंदुरुस्त झालेला श्रेयस अय्यर रणजीच्या उपांत्य फेरीत खेळणार)

नाना तुमच्या माईकमध्ये वायरस तर आला नाही ना…

विधानसभेच्या (Legislative Assembly) कामकाजात नाना पटोले यांनी भाग घेतला असतानाच माइक मधून खरखर आवाज येऊ लागल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी गंमतीत नाना तुमच्या माईकमध्ये वायरस तर गेला नाही ना असे म्हणत सभागृहात हास्यकल्लोळ उडवला. यावर नाना पटोले यांनी देखील प्रत्युत्तर दाखल या राज्यात जे काही घडत आहे त्याचे उगम स्थान इथेच आहे असे म्हणत देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्याकडे अंगुली निर्देश देखील केला. (Legislative Assembly)

बराच वेळ माईकची खरखर येत असल्याने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दहा मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करावे अशी सूचना केली. परंतु सुरू असलेल्या विधेयकाचे कामकाज संपल्यानंतर तहकूब करू असे विधानसभा अध्यक्षांनी सांगितले. त्यानंतर सभागृहाचे कामकाज तब्बल अर्ध्या तासासाठी थांबवण्यात आले. (Legislative Assembly)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.