देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी राज्य सरकारच्या आदेशावरून मुंबई महापालिकेने पुनर्प्रक्रिया (पिण्यायोग्य नसलेल्या) पाण्याने रस्ते धुण्याचे अभियान सुरु केले. शिवसेना उबाठा गटाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे (Thackeray) यांनी यावर पिण्याच्या पाण्याच्या कपातीचा संबंध जोडत टीका केली. त्यांच्या X वरील या पोस्टवर नेटकऱ्यांनी ठाकरे यांना ट्रोल करत यांची अब्रू काढली. त्यानंतर शिवसेना (शिंदे) नेते मिलिंद देवरा यांनीही ठाकरे यांच्या पोस्टवर उत्तर देत हा पॉलिटिकल स्टंट असल्याचा टोला हाणला. (Aaditya Thackeray)
ठाकरेंची पोस्ट
आदित्य ठाकरे (Thackeray) यांनी एका टॅंकरने रस्ता साफ करत असल्याचा व्हिडीओसह केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आज मुंबईला पाणीकपातीचा सामना करावा लागत असताना हे वरळी सी फेस जवळ चालू आहे. सौजन्य- खोके राजवटीतील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांच्या कल्पनेतील “डीप क्लिनिंग”. @mybmc या मूर्खपणासाठी प्रति टँकरची किंमत किती मोजली? तो नक्की काय करतोय?” विशेष म्हणजे त्यांच्या पोस्टमधील टँकरवर ‘non-potable’ (पिण्यास अयोग्य) असे स्पष्ट लिहिले आहे. (Aaditya Thackeray)
Today Mumbai faces a water cut. And this is going on near Worli Sea Face, courtesy- the great nonsensical idea of “deep cleaning” by the most incapable cm of the khoke regime.@mybmc what is the cost per tanker for this nonsense? What is he exactly doing? pic.twitter.com/mdI0Va0ftG
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 27, 2024
मुंबईका पप्पू
या पोस्टवर नेटकऱ्यांनी ठाकरेंना प्रचंड ट्रोल करत पिण्याच्या पाण्याची कपात आणि या पिण्यास अयोग्य पाण्याचा संबंध काय असा सवाल केला. एकाने म्हटले की एसी कारमधून फिरणाऱ्यांना रस्त्यावरील धूळ किती आहे हे माहित नसतं. ‘Penguin, पढ़ लिया होता तो ऐसी मूर्ख वाली बातें न करता । Deep cleaning is v essential for cleaner air’ असं एकाने म्हटलं. ‘Baby penguin getting touchy about water..now that’s some news..!!’ अशी प्रतिक्रिया एकाने दिली. ‘Yeah hai hamare Mumbai ka papu’ असे एकाने ठाकरे (Thackeray) यांना उद्देशून म्हटले. (Aaditya Thackeray)
(हेही वाचा – Legislative Assembly : …आणि सभागृहाचे कामकाज थांबले)
तुमचे मतदार मराठी आहेत कि ब्रिटिश?
एका नेटकाऱ्याने ठाकरेंच्या (Thackeray) इंग्रजीत पोस्ट केलेल्याला आक्षेप घेत, ‘मराठी भाषा गौरव दिवस, आणि तुम्ही परप्रांतीय भाषेत ट्विट करता? तुमचे मतदार मराठी आहेत कि ब्रिटिश? मराठी नाही तर मत मिळणार नाही, लवकर शहाणे व्हा,’ असा सल्ला दिला. (Aaditya Thackeray)
स्वच्छ रस्ते आणि स्वच्छ हवा
शिवसेना नेते मिलिंद देवरा यांनीही ठाकरे (Thackeray) यांना स्पष्टीकरण देत, “डीप क्लीनिंगसाठी वापरण्यात येणारे पाणी पुनर्प्रक्रिया केलेले पाणी असल्याचे म्हटले. तसेच “निरोगी मुंबईसाठी स्वच्छ रस्ते आणि स्वच्छ हवा,” असा दुहेरी फायदा असल्याचेही स्पष्ट केले. (Aaditya Thackeray)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community