Karnataka Congress : काँग्रेसच्या रॅलीत ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे; भाजपाकडून तक्रार दाखल

काँग्रेस नेत्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत भाजपाने मंगळवारी रात्री उशिरा हुसैन यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. भाजपाचे आमदार एन. रविकुमार आणि पक्षाचे आमदार आणि मुख्य सचेतक दोड्डंगौडा पाटील यांनी हुसेन आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध विधान सौधा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

332
Karnataka Congress : काँग्रेसच्या रॅलीत 'पाकिस्तान जिंदाबाद'चे नारे; भाजपाकडून तक्रार दाखल

कर्नाटकमध्ये राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस (Karnataka Congress) उमेदवारांच्या विजयानंतर ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा करण्यात आल्याचा आरोप भाजपाने केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ भाजपा कार्यकर्त्यांनी बेंगळुरूतील विधानसभेबाहेर निदर्शने केली. तसेच पोलिसात तक्रारही दाखल केली आहे.

(हेही वाचा – Rajya Sabha Election 2024 : राज्यसभेच्या १५ पैकी १० जागांवर भाजपा विजयी)

कर्नाटकात काँग्रेस विजयी “

कर्नाटकातील राज्यसभेच्या (Karnataka Congress) ४ जागांसाठी मंगळवारी (२७ फेब्रुवारी) झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला ३ जागा मिळाल्या आहेत, तर एक जागा भाजपाच्या खात्यात गेली आहे. कर्नाटकात काँग्रेसचे ३ उमेदवार अजय माकन, डॉ. सय्यद नसीर हुसेन आणि जीसी चंद्रशेखर हे अनुक्रमे ४७, ४६ आणि ४६ मतांनी विजयी झाले. मात्र, आता या विजयोत्सवावर गदारोळ सुरू आहे.

भाजपाकडून ‘तो’ व्हिडीओ शेअर :

भाजपाने काँग्रेसच्या (Karnataka Congress) विजयोत्सवाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काही वेळातच सय्यद नसीर हुसैन यांचे समर्थक विधानसभेत ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देताना ऐकू येत आहेत.

(हेही वाचा – Gujarat Drugs : तीन हजार किलो ड्रग्जसह चौघांना अटक; एटीएस, नौदल व एनसीबीची कारवाई)

भाजपाकडून तक्रार दाखल :

काँग्रेस नेत्यावर (Karnataka Congress) कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत भाजपाने मंगळवारी रात्री उशिरा हुसैन यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. भाजपाचे आमदार एन. रविकुमार आणि पक्षाचे आमदार आणि मुख्य सचेतक दोड्डंगौडा पाटील यांनी हुसेन आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध विधान सौधा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. अशा परिस्थितीत राज्यसभा खासदार नसीर हुसैन यांनी एक व्हिडिओ जारी करून स्पष्टीकरण दिले की, रॅलीत अशा घोषणा दिल्या गेल्या नाहीत.

(हेही वाचा – Legislative Assembly : …आणि सभागृहाचे कामकाज थांबले)

मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की;

याप्रकरणी आता मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. यासंदर्भात सिद्धरामय्या म्हणाले की, असे आरोप केवळ भाजपानेच नव्हे तर प्रसारमाध्यमांनीही हा असा आरोप केला आहे. याप्रकरणाची चौकशी करून दोषी व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. (Karnataka Congress)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.