Railroad Project: नागपूर-नागभीड रेल्वेमार्गाला राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मान्यता, वन्य प्राण्यांच्या भ्रमणासाठी ७ भुयारी मार्ग

851
Railroad Project: नागपूर-नागभीड रेल्वेमार्गाला राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मान्यता, वन्य प्राण्यांच्या भ्रमणासाठी ७ भुयारी मार्ग
Railroad Project: नागपूर-नागभीड रेल्वेमार्गाला राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मान्यता, वन्य प्राण्यांच्या भ्रमणासाठी ७ भुयारी मार्ग

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला नागपूर ते नागभीड रेल्वेमार्ग प्रकल्प पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयरण्यातून जात असलेल्या (Railroad Project) या रेल्वेमार्गाला राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने मान्यता दिल्याने नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा रेल्वेमार्ग पुढील ६ महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

नागपूर ते नागभीड या १०६.०२ किलोमीटर नॅरोगेज रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये (Broad gauge of narrow gauge railways) रुपांतर करण्यात येत आहे. नागपूर ते उमरेडपर्यंतचे काम अंतिम टप्प्यात आहे, परंतु उमरेड ते नागभीड यादरम्यानचे काम ठप्प आहे. यापैकी १६ किलोमीटर रेल्वेमार्ग उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातून जात आहे. त्यामुळे रेल्वेमार्गाच्या मान्यतेसाठी राज्य वन्यजीव मंडळ आणि भारतीय वन्य जीव संस्था, डेहराडून यांच्या कसोटीतून जावे लागले. त्यानंतर राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने ५ महिन्यांपासून निर्णय घेतला नव्हता.

(हेही पहा – Chandrakant Patil: मुलगा-मुलगी भेद नको, सर्वांनाच मोफत उच्चशिक्षण द्या, विधान परिषदेत मागणी)

वन्य प्राण्यांच्या भ्रमणासाठी ७ भुयारी मार्ग

मात्र आता वन्य प्राण्यांच्या भ्रमणासाठी ७ भुयारी मार्ग उभारण्याची सूचना करण्यात आली आहे. त्या भुयारी मार्गाची सरासरी लांबी १८८ मीटर ते ७७० मीटर एवढी ठेवावी लागणार आहे तसेच २२ रेल्वे क्रॉसिंग आणि पूल उभारावे लागणार आहेत. भारतीय रेल्वे आणि राज्य सरकारच्या सहभागातून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्र रेल्वे (महारेल) इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. (महारेल) हे काम करत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.