Ind vs Eng 5th Test : के एल राहुल पाचव्या कसोटीत खेळणार की नाही?

Ind vs Eng 5th Test : राहुल पाचव्या कसोटीसाठी तयार झाला तर रजत पाटिदारला रणजी खेळण्यासाठी मुक्त करण्यात येणार आहे

172
Ind vs Eng 5th Test : के एल राहुल पाचव्या कसोटीत खेळणार की नाही?
Ind vs Eng 5th Test : के एल राहुल पाचव्या कसोटीत खेळणार की नाही?

ऋजुता लुकतुके

मधल्या फळीतील फॉर्ममध्ये असलेला फलंदाज के एल राहुल (KL Rahul) पाचवी कसोटी (Ind vs Eng 5th Test) खेळणार की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे भारतीय संघ प्रशासनही त्याच्या दुखापतीच्या बाबतीत गोंधळलेलं आहे. सध्या राहुल (KL Rahul) कमरेच्या दुखापतीचं स्वरुप समजून घेण्यासाठी लंडनला गेल्याचं समजतंय. पण, तो भारतात कधी येणार आणि तंदुरुस्तीची चाचणी कधी होणार यावर पुढील गोष्टी अवलंबून आहेत. (Ind vs Eng 5th Test)

(हेही वाचा- Chandrakant Patil: मुलगा-मुलगी भेद नको, सर्वांनाच मोफत उच्चशिक्षण द्या, विधान परिषदेत मागणी )

पहिल्या हैद्राबाद कसोटीनंतर के एल राहुलने (KL Rahul) या मालिकेतून माघार घेतली आहे. कमरेचे स्नायू दुखत असल्याची तक्रार त्याने केली. सुरुवातीला बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाला ही दुखापत तुलनेनं साधी वाटली होती. आणि तो पुढच्या राजकोट कसोटीत पुन्हा खेळू शकेल, असा अंदाजही बंगळुरूच्या क्रिकेट अकादमीतील डॉक्टरनी व्यक्त केली होती. (Ind vs Eng 5th Test)

पण, या दोन्ही कसोटींच्या एक दिवस आधी तो ९० टक्के तंदुरुस्त आहे आणि खेळू शकणार नाही, अशीच माहिती मीडियाला दिली गेली. वैद्यकीय पथकाला तपासणीत काही गंभीर आढळलं नसलं तरी राहुलला (KL Rahul) खेळताना त्रास होतोय. आणि गेल्यावर्षीच्या शस्त्रक्रियेनंतर राहुलही थोडा सावध आहे. (Ind vs Eng 5th Test)

(हेही वाचा- Ishan Kishan : अखेर इशान किशनचं स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन  )

‘वैद्यकीय पथकाला सुरुवातीला वाटलं की, राहुल शेवटच्या तीन कसोटींत (Ind vs Eng 5th Test) आरामात खेळू शकेल. पण, एकदिवसीय विश्वचषक आणि दक्षिण आफ्रिकेत फलंदाजीबरोबरच यष्टीरक्षणाची जबाबदारी याचा विपरित परिणाम राहुलच्या स्नायूंच्या दुखापतीवर झालेला दिसत आहे. त्याला अजूनही फलंदाजी करताना त्रास जाणवत आहे. स्कॅन तपासणीत थोडी सूजही आढळून आली आहे. हे अहवाल लंडनमधील डॉक्टरना पाठवण्यात आले. पण, त्यावरून उपचार ठरवता येत नव्हते. त्यामुळे अखेर डॉक्टरनी त्याला लंडनलाच बोलावून घेतलं. आणि त्यामुळे राहुल (KL Rahul) सध्या लंडनमध्ये आहे,’ असं बीसीसीआयमधील (BCCI) सूत्रांनी मीडियाशी बोलताना सांगितलं आहे. (Ind vs Eng 5th Test)

राहुलचा समावेश अनिश्चित असल्यामुळे संघ प्रशासन रजत पाटिदारवरही निर्णय घेऊ शकत नाहीए. कारण, राहुल (KL Rahul) खेळण्याची हमी असेल तर पाटिदारला मध्यप्रदेशकडून रणजी सामना खेळावा असं प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना वाटतं. पण, त्यासाठी राहुल खेळण्याची हमी हवी. पण, तीच सध्या मिळत नाहीए. (Ind vs Eng 5th Test)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.