Zeeshan Siddiqui : …आणि Congress चे MLA झिशान सिद्दीकी समाजवादी पक्षाच्या बाकांवर बसले

228
Zeeshan Siddiqui : ...आणि Congress चे MLA झिशान सिद्दीकी समाजवादी पक्षाच्या बाकांवर बसले
Zeeshan Siddiqui : ...आणि Congress चे MLA झिशान सिद्दीकी समाजवादी पक्षाच्या बाकांवर बसले

काँग्रेसचे (Congress) आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddiqui) यांनी आज बुधवारी २७ फेब्रुवारीला राज्य विधिमंडळ अधिवेशनाला हजेरी लावत विधानसभेत प्रवेश करताच भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी त्यांच्याकडे हात करत सत्ताधारी पक्षाच्या बाकांवर बसण्यासाठी आमंत्रित केले. तेव्हा सभागृहात एकच हशा पिकला. सिद्दीकी (Zeeshan Siddiqui) यांनाही हसू आवरता आले नाही आणि हसत हसतच  काँग्रेसच्या (Congress) नेत्यांकडे न फिरकता थेट समाजवादी पक्षाच्या बाकावर बसलेल्या आमदार अबू असीम आझमी आणि रईस शेख यांच्याशी हस्तांदोलन करत त्यांच्या शेजारी बसणे पसंत केले.

(हेही वाचा- Rajyasabha : भाजप 97, रालोआ 117; राज्यसभेत काय आहे पक्षीय संख्याबळ ?)

‘बाबां’नी पक्ष सोडला, मुलगा वाटेवर

झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddiqui) यांचे वडील आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांनी काँग्रेसला (Congress) राम राम करत काही दिवसांपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Nationalist Congress Party) प्रवेश केला. झिशान (Zeeshan Siddiqui) या टर्ममधील सगळ्यात तरुण आमदार असून त्यांची आमदारकीची पहिली टर्म आहे. झिशान (Zeeshan Siddiqui) हे मुंबई युवक काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष होते. मात्र बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांनी पक्षत्याग केल्यानंतर झिशानदेखील (Zeeshan Siddiqui) पक्ष सोडून जाणार, असा कयास काँग्रेस (Congress) नेत्यांनी बांधला आणि त्यांना पदावरून हटविण्यात आले, असे सूत्रांकडून  सांगण्यात आले.

पाच वर्षाचा कालावधी पूर्ण करण्याकडे कल

काँग्रेस  (Congress) पक्षातही झिशान (Zeeshan Siddiqui) यांना पक्ष सोडून जाणारे म्हणून गृहीत धरण्यात येत आहे. एका काँग्रेस (Congress) आमदाराने ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना सांगितले की सद्याची झिशान (Zeeshan Siddiqui) यांची आमदारकीची पहिली टर्म असल्याने शक्यतो पाच वर्षाचा कालावधी पूर्ण करण्याकडे त्यांचा कल आहे. पक्षत्याग केलाच तर लोकसभा निवडणुकीनंतर ते पक्ष सोडतील, असे त्या आमदाराने सांगितले.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.