सुजित महामुलकर
वंचित (Vanchit) बहुजन आघाडीने आज २८ फेब्रुवारीला काँग्रेस-शिवसेना (उबाठा) (Congress-Shiv Sena (Ubhata)) – राष्ट्रवादी (शप) (Nationalist (cp)) यांच्या महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) प्रस्ताव देत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Jarange Patil) यांना जालना लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) सर्वमान्य उमेदवार म्हणून जाहीर करावे, अशी मागणी केली.
(हेही वाचा- Mahabaleshwar : महाबळेश्वरजवळ भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे कोणती ? )
जालनातून जरांगे, पुण्यातून वैद्य
आज महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) लोकसभा जागावाटपाची बैठक झाली. या बैठकीला वंचित (Vanchit) बहुजन आघाडीचे चार सदस्य उपस्थित होते. यावेळी वंचित आघाडीने महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) प्रस्ताव देत जालना लोकसभा मतदारसंघातून जरांगे पाटील (Jarange Patil) आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून डॉ. अभिजित वैद्य (Dr. Abhijit Vaidya) यांना लोकसभा उमेदवारी द्यावी, असा प्रस्ताव दिला आहे.
१५ ओबीसी, तीन उमेदवार अल्पसंख्यांक असावे
वंचितची (Vanchit) दुसरी मागणी आहे की महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवारांच्या यादीत किमान १५ ओबीसी उमेदवार असावेत तर तिसरी मागणी अशी की महाविकास आघाडीचा (Mahavika Aghadi) उमेदवार भाजपमध्ये (BJP) जाणार नाही. महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षाने असे लेखी वचन दिले पाहिजे की, पक्ष किंवा त्यांचा निवडून आलेला उमेदवार निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर भाजपामध्ये सामील होणार नाही तर शेवटचा प्रस्ताव आहे की, महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवारांच्या यादीत किमान तीन उमेदवार अल्पसंख्यांक समाजाचे असावेत.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community