महाराष्ट्राच्या नमो महिला सक्षमीकरण अभियानाद्वारे ५५ लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळेल, तर २ कोटी महिला बचत गटांशी जोडल्या जातील, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यवतमाळ येथे केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी यवतमाळमध्ये विविध विकासकामांचं उद्घाटन केलं. यावेळी बोलताना मोदींनी ‘जय भवानी जय शिवाजी, जय सेवालाल, जय बिरसा’, असे उपस्थितांना मराठी अभिवादन करून भाषणाला सुरुवात केली.
(हेही वाचा – Narendra Modi: पंतप्रधान मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल; युपीएच्या भ्रष्ट कामांमुळे लोकांना योजनांचा लाभ मिळतच नव्हता)
यावेळी केलेल्या भाषणात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,, महिला सक्षमीकरणाचा नवीन अध्याय मोदीजींनी लिहिला आहे. पंतप्रधानांसह एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राज्यपाल रमेश बैस यांच्यासह महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री सभास्थळी उपस्थित होते. यावेळी मोदींच्या हस्ते ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’चे वितरण करण्यात आले.
मोदींविषयी पंतप्रधानांनी काढले गौरवोद्गार…
मागील दशक आमच्या देशासाठी सुवर्णकाळ होता. या सुवर्णकाळाचे शिल्पकार मोदीजी आहेत. महाराष्ट्रात मोदीजींमुळे अनेक योजना मिळत असून त्यांचे महाराष्ट्रावर विशेष प्रेम आहे, असे गौरवोद्गारही यावेळी मोदींनी काढले आहेत.
हेही पहा –