संदेशखली येथील महिलांवरील अत्याचारांच्या प्रकरणात आरोपी असलेला पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचा नेता शहाजहान शेख याला पश्चिम बंगाल पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याला गुरुवारी (29 फेब्रुवारी) सकाळी मिनाखान परिसरातून अटक केली. या महिन्याच्या सुरुवातीला अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकावर झालेल्या हल्ल्यानंतर शाहजहान शेख फरार होता. पोलिसांनी यापूर्वीच त्याच्या काही साथीदारांना अटक केली आहे. (Sandeshkhali Case)
मिनाखानचे एसडीपीओ अमिनुल इस्लाम खान यांनी सांगितले की, पश्चिम बंगाल पोलिसांनी उत्तर 24 परगण्यातील मिनाखान परिसरातून शाहजहान शेखला अटक केली. त्याला बशीरहाट न्यायालयात नेण्यात आले आहे.
(हेही वाचा – PM Narendra Modi :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळमध्ये 4900 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे केले उद्घाटन आणि लोकार्पण)
Sheikh Shahjahan will be produced before the Basirhat Court at 2 pm today: SDPO of Minakhan, Aminul Islam Khan https://t.co/fJI8SD7acY
— ANI (@ANI) February 29, 2024
5 जानेवारी रोजी पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखली येथे सुमारे 1000 लोकांच्या जमावाने ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला होता, जेव्हा ते कथित रेशन वितरण घोटाळ्याच्या चौकशीसाठी शाहजहान शेखच्या निवासस्थानी गेले होते. शाहजहान शेखच्या विरोधात कारवाई सुरूच आहे. दरम्यान, शाहजहानला आज बशीरहाट न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
शाहजहान शेखला अटक कोण करणार ?
संदेशखली येथील महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि जमीन हडप करण्याच्या प्रकरणातही शाहजहान शेख मुख्य आरोपी आहे. त्यामुळे शाहजहान शेखला सीबीआय, अंमलबजावणी संचालनालय किंवा पश्चिम बंगाल पोलिस असे कोणीही अटक करू शकते, असे निर्देश कलकत्ता उच्च न्यायालयाने बुधवारी दिले. (Sandeshkhali Case)
हेही पहा –