देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या अनेक संघटनांवर सरकार कठोर कारवाई करत आहे. सरकारने नुकतेच मुस्लिम कॉन्फरन्स जम्मू-काश्मीर (Muslim Conference Jammu and Kashmir, सुमजी गट) आणि (भट गट) या दोन गटांवर पाच वर्षांसाठी बंदी घातली.
गेल्या तीन महिन्यांत जम्मू-काश्मीरमध्ये सरकारने बंदी घातलेली ही चौथी संघटना आहे. यापूर्वी डिसेंबर 2023 मध्ये तेहरीक-ए-हुर्रियत (Tehreek-e-Hurriyat) आणि मुस्लिम लीग मसरत आलम (Muslim League Masrat Alam) गटांवर बंदी घालण्यात आली होती. 27 फेब्रुवारी रोजी सरकारने जमात-ए-इस्लामी (Jamaat-e-Islami), जम्मू आणि काश्मीर (JeI) वर घातलेली बंदी पाच वर्षांसाठी वाढवली आहे.
(हेही वाचा – Kolad : कोलाड – एक निसर्गरम्य पर्यटनस्थळ)
भारतविरोधी आणि पाकिस्तान समर्थक प्रचार
गुलाम नबी सुमजी यांच्या नेतृत्वाखालील मुस्लिम कॉन्फरन्स जम्मू-काश्मीर-सुमजी गट (MCJK-S), भारतविरोधी आणि पाकिस्तान समर्थक प्रचार करत होती. तिचे सदस्य दहशतवाद्यांना मदत करण्यात गुंतलेले आहेत, असे गृह मंत्रालयाने प्रसारित केलेल्या सूचनेत म्हटले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी X या माध्यमावर म्हटले की, मोदी सरकार दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असलेल्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. बंदी घालण्यात आलेल्या संघटना देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडता यांच्या विरोधात काम करत आहेत.
Striking terror networks with undiminished vehemence the government has declared the Muslim Conference Jammu & Kashmir (Sumji faction) and Muslim Conference Jammu & Kashmir (Bhat faction) as Unlawful Associations.
These outfits have been engaging in activities against the…
— Amit Shah (@AmitShah) February 28, 2024
केंद्र सरकारने घेतली गंभीर दखल
मुस्लिम कॉन्फरन्स ही संघटना काश्मीरमधील जनतेला निवडणुकीत सहभागी न होण्याचे आवाहन करत आहे. हे देशाची अखंडता, सार्वभौमत्व आणि सुरक्षेसाठी घातक आहे. मुस्लिम कॉन्फरन्स जम्मू-काश्मीरला भारतापासून तोडण्याचा प्रचार करत होती.
मुस्लिम कॉन्फरन्स जम्मू आणि काश्मीर (Muslim Conference Jammu and Kashmir, सुमजी गट) च्या बेकायदेशीर कारवायांवर ताबडतोब अंकुश ठेवला नाही तर देशविरोधी कारवाया सुरू ठेवण्यासाठी या संधीचा वापर करेल, असे केंद्र सरकारचे मत असल्याचे गृह मंत्रालयाने म्हटले आहे. (Muslim Conference)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community