Afghanistan : अफगाणिस्तानचा व्यापार आता इराणमधील बंदरांतून; पाकिस्तानला झटका

Afghanistan : अफगाणिस्तान आयात आणि निर्यात यांसाठी पाकवर अवलंबून होता. पाकच्या कराची बंदरातून अफगाणिस्तान आयात-निर्यात करत होता.

250
Afghanistan : अफगाणिस्तानचा व्यापार आता इराणमधील बंदरांतून; पाकिस्तानला झटका
Afghanistan : अफगाणिस्तानचा व्यापार आता इराणमधील बंदरांतून; पाकिस्तानला झटका

भारताने इराणमध्ये बांधलेल्या चाबहार आणि इराणचे बंदर अब्बास या बंदरांचा वापर करून अफगाणिस्तानमधील (Afghanistan) तालिबान सरकार (Taliban government) जगात आयात आणि निर्यात व्यापार करत आहे. यामुळे पाकिस्तानचा व्यापार ७० टक्क्यांनी कमी झाला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानच्या (Pakistan) २० हजार लोकांच्या नोकर्‍या धोक्यात आल्या आहेत.

(हेही वाचा – Sandeshkhali Case : अत्याचारी शाहजहान शेखच्या मुसक्या आवळल्या; पश्चिम बंगाल पोलिसांनी केली अटक)

पाकचा दबाव झुगारला

अफगाणिस्तान आयात आणि निर्यात यांसाठी पाकवर अवलंबून होता. पाकच्या कराची बंदरातून अफगाणिस्तान आयात-निर्यात करत होता. पाकिस्तान अफगाणिस्तानवर ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ या पाकमध्ये कारवाया करणार्‍या संघटनेवर कारवाई करण्यासाठी दबाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत होता. यासाठी पाकने त्याच्या देशातील लाखो शरणार्थी अफगाणींची हकालपट्टीही करत आहे. हा दबाव झुगारण्यासाठी तालिबान सरकारने इराणमधून व्यापार चालू केला आहे.

तालिबानचा नेता मुल्ला अब्दुल गनी बरादर याने इराणला व्यापारासाठी चाबहार बंदराचा वापर करण्यास अनुमती देण्याचे आवाहन केले होते. चाबहार बंदराद्वारे व्यापार केल्याने तालिबानचा करही वाचतो आणि वेळेचीही बचत होत आहे. चाबहार बंदरामुळे अफगाणिस्तान आता युरोप, आखाती देश, भारत आणि चीन यांच्याशी जोडला गेला आहे. चाबहार बंदराच्या विकासासाठी भारताने अब्जावधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. (Afghanistan)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.