Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल; सलीम कुत्ता डान्स पार्टी प्रकरण भोवले

Sudhakar Badgujar : नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुधाकर बडगुजर प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे दिला होता. गुन्हे शाखेने चौकशी करून अहवाल आयुक्तांना सादर केला आहे. अहवालानुसार सलिम कुत्तासमवेत झालेल्या डान्स पार्टीत सुधाकर बडगुजर उपस्थित होते.

269
Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल; सलीम कुत्ता डान्स पार्टी प्रकरण भोवले
Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल; सलीम कुत्ता डान्स पार्टी प्रकरण भोवले

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ताच्या (Salim Kutta) डान्स पार्टीमध्ये उबाठा गटाचे नेते सुधाकर बडगुजर हेही असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. नाशिक पोलिसांनी (Nashik Police) अखेर या प्रकरणात बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांची या प्रकरणात चौकशी सुरु होती. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात या प्रकरणावरून बराच गदारोळ झाला होता.

सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल

नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुधाकर बडगुजर प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे दिला होता. गुन्हे शाखेने चौकशी करून अहवाल आयुक्तांना सादर केला आहे. अहवालानुसार सलिम कुत्तासमवेत झालेल्या डान्स पार्टीत सुधाकर बडगुजर उपस्थित होते. त्यानंतर बेकायदेशीर कृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सलिम कुत्ता उर्फ मोहमंद सलीम मीरा मोईद्दीन शेख याच्याविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.

(हेही वाचा – Drugs Seized : गुजरात किनाऱ्यावर जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जच्या साठ्याचे इराण कनेक्शन ?)

आतापर्यंत 17-18 जणांची चौकशी

सलिम कुत्ता (Salim Kutta) पार्टी प्रकरणात पोलिसांनी सुधाकर बडगुजर यांच्यासह पवन मटाले, रवी शेट्टी, सरप्रीतसिंग यांच्यासह आतापर्यंत 17-18 जणांची चौकशी केली आहे. सुधाकर बडगुजर यांचीही अनेक वेळा पोलिसांनी चौकशी केली.

सुधाकर बडगुजर हे उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत. विधिमंडळात आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी कुत्तासोबत झालेल्या डान्स पार्टीत बडगुजर हेही नाचल्याचे प्रकरण उपस्थित केले होते. नितेश राणे यांनी पार्टीचे फोटो आणि व्हिडिओही विधानसभेत दाखवले होते. या नंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा केली होती. (Sudhakar Badgujar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.