- ऋजुता लुकतुके
मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि वॉल्ट डिस्नी कंपनीने विलिनीकरणाच्या करारावर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे वायकॉम १८ आणि स्टार इंडिया या कंपन्या एकत्र येऊन एक नवीन मनोरंजन कंपनी आता स्थापन होणार आहे. रिलायन्सने या नवीन कंपनीच्या विस्तारासाठी ११,५०० कोटी रुपये देण्याचं मान्य केलं आहे. (Reliance-Disney Merger)
करारानुसार, वायकॉम १८ मधील मनोरंजन कंपनी स्टार इंडियात विलीन होणार आहे. आणि या विलिनीकरणानंतर तयार होणारी नवीन कंपनी ही ७०,५८० कोटी रुपये मूल्यांकनाची असेल. म्हणजे जवळ जवळ ८.५ अब्ज अमेरिकन डॉलर. झी आणि सोनीच्या विलिनीकरणाचा करार जर पार पडला असता तर १० अब्ज मूल्याचा असला असता. या कंपनीत रिलायन्सचा वाटा १६.१४ टक्के, वायकॉम १८ चा वाटा ४६.८२ टक्के आणि डिस्नीचा वाटा ३६.८४ टक्के असेल. नवीन कंपनीच्या अध्यक्ष नीता अंबानी (Nita Ambani) असतील. तर उपाध्यक्षपदी उदय शंकर असतील. (Reliance-Disney Merger)
Reliance-Viacom18-Disney Deal Done
▪️Viacom18 to merge with Star India
▪️Through a court-approved scheme of arrangement.
▪️RIL has agreed to invest Rs 11,500 crore ($ 1.4 billion) in the jv.
▪️Transaction values jv at Rs 70,352 crore ($ 8.5 billion) on a post-money basis.… pic.twitter.com/Qtx0q8CdSU
— menaka doshi (@menakadoshi) February 28, 2024
(हेही वाचा – Afghanistan : अफगाणिस्तानचा व्यापार आता इराणमधील बंदरांतून; पाकिस्तानला झटका)
रिलायन्स आणि डिस्नीकडे मिळून १२० टीव्ही वाहिन्या
दोन कंपन्यांनी हा सहमती करार केला असला तरी त्याला सेबी, दोन्ही कंपन्यांचे समभागधारक तसंच सरकारी मंजुरी लागेल. आणि वेळेवर मिळाली तर २०२४ सालची शेवटची तिमाही नाहीतर २०२५ च्या पहिल्या तिमाहीत हा करार पूर्णत्वासही येऊ शकतो. रिलायन्स आणि डिस्नीचं स्ट्रिमिंग ॲप आहे. त्याशिवाय दोघांकडे मिळून १२० टीव्ही वाहिन्याही आहेत. जवळ जवळ ३०,००० कार्यक्रमाचे हक्कं आता दोन्ही कंपन्यांकडे मिळून जमा झाले आहेत. (Reliance-Disney Merger)
भारतीय मनोरंजन उद्योग सध्या २८ अब्ज अमेरिकन डॉलरचा आहे. आणि तो अजूनही वाढतोय. अशावेळी दोन दिग्गज कंपन्यांचं एकत्र येणं या उद्योगासाठी महत्त्वाचं आहे. आतापर्यंत वायकॉम १८ आणि डिस्नी या कंपन्यांची क्रीडा प्रसारणासाठी मोठी स्पर्धा होती. २०२२ मध्ये पहिल्यांदा वायकॉम १८ ने डिस्नीला आयपीएल प्रसारणाच्या शर्यतीत मागे टाकलं. पण, आता दोन कंपन्या एकत्र येत आहेत. (Reliance-Disney Merger)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community