DCM Ajit Pawar : मुख्यमंत्र्यांची बनावट सही, शिक्का वापरल्याची बाब गंभीर, कोणालाही पाठीशी घालणार नाही; उपमुख्यमंत्री पवारांचा विधानसभेत इशारा

उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट सही आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदने सचिवालयात कार्यवाहीसाठी आल्याचे मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना आढळून आले आहे.

190
DCM Ajit Pawar : नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी खडकवासल्याचे पाणी रात्री सोडण्याऐवजी पहाटे सोडण्याचा निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची बनावट सही आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदने समोर आली असून त्याची राज्य शासनाने या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेतली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास सुरु आहे. याप्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसेभत दिली. (DCM Ajit Pawar)

उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची बनावट सही आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदने सचिवालयात कार्यवाहीसाठी आल्याचे मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना आढळून आले आहे. ही बाब गंभीर असून तेवढ्याच गंभीरपणे राज्य सरकारने त्याची दखल घेतली आहे. (DCM Ajit Pawar)

(हेही वाचा – Marathi Language : मराठी विषय न शिकवणाऱ्या शाळांना सरकारी दणका; मान्यता रद्द होणार)

या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये प्रथम माहिती अहवाल (FIR) दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामागे कोण आहे याचा तपास सुरु आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. याप्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी (DCM Ajit Pawar) दिली. याबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता. (DCM Ajit Pawar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.