Rohit Pawar : ‘ती’ व्यक्ती आणि रोहित पवारांचा संबंध काय?; आमदार राम कदम यांचे विधानसभेत गंभीर आरोप

Rohit Pawar : 'देवेंद्र फडणवीसांना या मातीत गाडणार', असे बोलणाऱ्याला सोडवण्यासाठी रोहित पवारांनी पोलिसांना फोन केला. रोहित पवार आणि या व्यक्तीचा काय संबंध असा प्रश्न भाजपा आमदार राम कदम कदम यांनी उपस्थित केला आहे.

218
Rohit Pawar : 'ती' व्यक्ती आणि रोहित पवारांचा संबंध काय?; आमदार राम कदम यांचे विधानसभेत गंभीर आरोप
Rohit Pawar : 'ती' व्यक्ती आणि रोहित पवारांचा संबंध काय?; आमदार राम कदम यांचे विधानसभेत गंभीर आरोप

महाराष्ट्रात जातीवाद कसा पसरेल, याचे मोठे षडयंत्र व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले. ‘देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) या मातीत गाडणार’ असे त्यातला इसम बोलतो, देवेंद्र फडणवीसांसारखे महाराष्ट्रातले ब्राह्मण ३ मिनिटांत संपवून टाकू, असे बोलतो. याबाबत सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात ज्याला पकडण्यात आले. त्याला सोडवण्यासाठी रोहित पवारांनी पोलिसांना फोन केला. रोहित पवार आणि या व्यक्तीचा काय संबंध असा प्रश्न भाजपा आमदार राम कदम कदम यांनी उपस्थित केला आहे. (Rohit Pawar)

(हेही वाचा – Marathi Language : मराठी विषय न शिकवणाऱ्या शाळांना सरकारी दणका; मान्यता रद्द होणार)

२९ फेब्रुवारी रोजी विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर सभागृहात पाँईट ऑफ इन्फॉर्मेशनच्या अंतर्गत भाजपा आमदार राम कदम यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले.

रोहित पवारांचा योगेश सावंतशी काय संबंध ?

आमदार राम कदम (MLA Ram Kadam) पुढे म्हणाले की, महाराष्ट्र मराठ्यांचा आहे आणि मराठेच राज्य करणार, असे तो बोलतो. देवेंद्र फडणवीसांबद्दल कोणी असे बोलणार असेल, तर ते सहन करणार नाही. योगेश सावंत असे या माणसाचे नाव आहे. त्याचे संबंध बारामतीशी असून या माणसाला सोडण्यासाठी रोहित पवार यांनी पोलिसांना फोन केला. रोहित पवारांचा योगेश सावंतशी काय संबंध ? मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे; पण मराठ्यांच्या आडून राज्यात जाती-जातींत तेढ निर्माण करण्याचे काम रोहित पवार आणि त्यांचे बगलबच्चे करत असतील, तर ते मराठा समाजाला बदनाम करत आहेत.

योगेश सावंत याच्यामागे कोण कोण आहे ? – आमदार आशिष शेलार

दरम्यान, एक समाज ३ मिनिटांत आम्ही संपवू देवेंद्र फडणवीस तुला संपवू, असे व्हिडिओत आहे. युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याने तक्रार केली. त्यात योगेश सावंत सापडला. त्याने तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पदाधिकारी आहे, असे मान्य केले. रोहित पवार यांनी स्वत: वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन केला. त्यांचा संबंध काय ? योगेश सावंतचा पत्ताही बारामतीतला आहे. रोहित पवार यांचा योगेश सावंतशी संबंध काय ? योगेश सावंत याच्यामागे कोण कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली. त्यावर या प्रकरणाची सखोल चौकशी करावी असे आदेश तालिका अध्यक्षांनी दिले आहेत. (Rohit Pawar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.