Ravindra Jadeja : रांचीत रवींद्र जडेजाने दिली महेंद्रसिंग धोनीला भेट

रवींद्र जडेजाच्या उमेदीच्या काळात तेव्हा कर्णधार असलेल्या महेंद्रसिंग धोनीने जडेजावर नियमितपणे विश्वास दाखवला होता.

184
Ravindra Jadeja : रांचीत रवींद्र जडेजाने दिली महेंद्रसिंग धोनीला भेट
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघ चौथी कसोटी खेळण्यासाठी रांची शहरात आला होता. आणि रांची हे शहर आहे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचं घर. त्यामुळे आपल्या या आयकॉन खेळाडूला भेटण्याची संधी संघाचा महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू रवी जडेजा (Ravindra Jadeja) कसा सोडेल? जडेजाला चेन्नई सुपरकिंग्जकडून पदार्पणाची संधी धोनीने दिली. तिथून भारतीय संघातील नियमित स्थान आणि बस्तान बसवण्यासाठी धोनीनेच मदत केली. त्यामुळे जडेजा नेहमीच धोनीचा सल्ला घेत असतो. आणि आताही त्याने धोनीला भेटण्याची संधी सोडली नाही. (Ravindra Jadeja)

कसोटी सामना संपल्या संपल्या जडेजा धोनीच्या फार्म हाऊसवर पोहोचला. आणि तिथे त्याने घराबाहेर एखाद्या चाहत्यासारखा फोटोही काढला. ‘एखाद्या चाहत्याप्रमाणे दिग्गज खेळाडूच्या घराबाहेर उभं राहून फोटो काढण्यातही वेगळी गंमत आहे,’ असा मथळा जडेजाने या पोस्टला दिला आहे. (Ravindra Jadeja)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ravindrasinh jadeja (@royalnavghan)

(हेही वाचा – Rohit Pawar : ‘तो’ व्यक्ती आणि रोहित पवारांचा संबंध काय?; आमदार राम कदम यांचे विधानसभेत गंभीर आरोप)

रांचीतील विजयानंतर भारतीय संघाने इंग्लंड विरुद्धची मालिकाही ३-१ ने जिंकली आहे. आणि त्याचबरोबर आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर मजबूत पकड बसवली आहे. पहिल्या स्थानावर न्यूझीलंडचा संघ आहे. भारतीय संघाने या हंगामात ५ विजय, २ पराभव आणि १ कसोटी अनिर्णित राखली आहे. (Ravindra Jadeja)

भारतीय संघाची विजयाची टक्केवारी ६४.४८ इतकी आहे. तर न्यूझीलंडची ७५ टक्के. पाहुणा इंग्लिश संघ या मालिकेतील पराभवानंतर शेवटून दुसऱ्या म्हणजे आठव्या स्थानावर फेकला गेला आहे. भारताच्या खालोखाल ऑस्ट्रेलियन संघ तिसऱ्या स्थानावर आहे. (Ravindra Jadeja)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.