Teele Wali Masjid Case : आता ‘या’ मशिदीच्या प्रकरणात मुस्लिम पक्ष हादरला; न्यायालयाने फेटाळली याचिका

या मशिदीच्या जागी लक्ष्मणाची टेकडी असल्याचे सांगत हिंदू पक्षाने याचिका दाखल केली होती. हिंदूंचे धार्मिक स्थळ पाडून ही मशीद बांधण्यात आल्याचा दावा याचिकेत करण्यात आला.

287
Teele Wali Masjid Case : आता 'या' मशिदीच्या प्रकरणात मुस्लिम पक्ष हादरला; न्यायालयाने फेटाळली याचिका

लखनौच्या टिलेवाली मशिदीच्या (Teele Wali Masjid Case) बाबतीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर पाडून ही मशीद बांधण्यात आली, अशी याचिका हिंदू पक्षाने दाखल केली आहे. न्यायालयाने खटला मंजूर केला होता परंतु मुस्लिम बाजूने या आदेशाच्या विरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली होती, जी न्यायालयाने फेटाळली होती. त्यामुळे मुस्लिम पक्षाला मोठा धक्का बसला आहे. तसेच न्यायालयाच्या या निर्णयाचे वर्णन हिंदू पक्षाचा विजय असे केले जात आहे.

(हेही वाचा – DCM Ajit Pawar : मुख्यमंत्र्यांची बनावट सही, शिक्का वापरल्याची बाब गंभीर, कोणालाही पाठीशी घालणार नाही; उपमुख्यमंत्री पवारांचा विधानसभेत इशारा)

नेमकं प्रकरण काय ?

या मशिदीच्या जागी लक्ष्मणाची टेकडी (Teele Wali Masjid Case) असल्याचे सांगत हिंदू पक्षाने याचिका दाखल केली होती. हिंदूंचे धार्मिक स्थळ पाडून ही मशीद बांधण्यात आल्याचा दावा याचिकेत करण्यात आला. न्यायालयाने तो खटला फेटाळला होता, परंतु मुस्लिम बाजूने यावर पुनर्विचार याचिका दाखल केली होती. २०१३ मध्ये ही मशीद काढून हिंदूंच्या ताब्यात द्यावी, अशी याचिका दाखल करण्यात आली होती.

(हेही वाचा – Google Gemini AI : ‘आमची चूक झाली,’ असं जेमिनीबाबत म्हणण्याची वेळ सुंदर पिचाई यांच्यावर का आली?)

मुस्लिम बाजूच्या युक्तिवादाशी असहमती :

याचिकेमध्ये हा संपूर्ण परिसर महादेवाचा असल्याचा दावा (Teele Wali Masjid Case) करण्यात आला होता. २०१७ मध्ये ट्रायल कोर्टाने याचिकेवरील प्रतिवादीचा आक्षेप फेटाळला होता. दर शुक्रवारी मोठ्या संख्येने मुस्लिम या मशिदीला भेट देतात. मशिद-मंदिरावरून सुरू असलेला वाद येत्या काही दिवसांत आणखी वाढू शकतो, असे मानले जाते. अशातच लखनौ न्यायालयाने याचिकेवर सुनावणी करताना मुस्लिम बाजूच्या युक्तिवादाशी असहमती दर्शवली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.