- सचिन धानजी, मुंबई
मुंबई महापालिकेच्यावतीने वाहने उभी करण्यासाठी अत्याधुनिक स्वयंचलित वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून माटुंगा मध्य रेल्वे आणि मुंबादेवी मंदिर पाठोपाठ आता फोर्ट येथील हुतात्मा चौक जवळील अप्सरा पेन शॉपजवळील जागेत अत्याधुनिक वाहनतळ उभारण्यास मंजूरी दिली आहे. विशेष म्हणजे माटुंगा मध्य रेल्वे आणि मुंबादेवी मंदिर आदी परिसरात वाहनतळाची उभारणी करण्यासाठी कंत्राटदारांची नेमणूक करून एक वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटला असून या दोन्ही कामांना अद्याप सुरूवात झाली नाही. असे असताना या तिसऱ्या वाहनतळासाठी कंत्राटदार नेमून केवळ प्रशासन कंत्राटदारांना कामे बहाल करण्यासाठीच या निविदा काढतात का असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे हुतात्मा चौक (Hutatma Chowk) येथील वाहनतळाच्या कामांसाठी प्रशासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा ५२ टक्के अधिक दराने बोली लावून जी. एस. टी वगळता सुमारे ६२ कोटी रुपयांमध्ये होणारे काम हे चक्क सुमारे ९५ कोटी रुपयांमध्ये मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. (Hutatma Chowk Car Parking)
वाहनांची संख्या ४० लाखांवर
सर्वात दाट शहरांपैकी एक असलेल्या मुंबईत वाहनतळाची मोठी समस्या गेल्या काही वर्षापासून मुंबईमध्ये वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे दिवसभर वाहतूक कोंडी आणि पर्यायाने अपघात, ध्वनी व वायु प्रदूषण आदींचे प्रमाणही वाढले आहे. सन २०१४ पासून आजपर्यंत मुंबईतील वाहनांची घनता १६ टक्क्यांनी वाढली आहे. सन २०१४ च्या सर्वेक्षणामध्ये शहरातील नोंदणीकृत वाहनांची संख्या २५.४६ लाख एवढी होती, ती २०२० मध्ये वाढून आता सुमारे ४० लाख एवढी झाली आहे. (Hutatma Chowk Car Parking)
मुंबईत केवळ ४५,००० वाहने उभी करण्याची क्षमता
नागरिकांच्या राहणीमानामध्ये झालेली सुधारणा, ऑटोमोबाईल उद्योगातील तेजीमुळे तसेच वाहन खरेदीकरीता सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध होणे यामुळे वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. तसेच रस्त्यांवरील बेकायदेशीर पार्किंगची जागा आणि तिची सहज उपलब्धता हे मुंबईतील कार आणि दुचाकींच्या संख्येत वाढ होण्याचे मुख्य कारण असल्याचे तज्ञांचे मत आहे. बेकायदेशीर पार्किंगच्या अतिक्रमणामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. रस्त्यावरील वाहनतळाची जागा फक्त ४५००० एवढी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे वाहनतळाच्या जागांचा पुरवठा आणि मागणी यामध्ये मोठी तफावत आहे, असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. (Hutatma Chowk Car Parking)
(हेही वाचा – BCCI Contracts : फक्त इशान, श्रेयसच नाही तर ‘या’ चार ज्येष्ठ खेळाडूंनाही वगळलं)
सुमारे ९५ कोटींचा खर्च
त्यामुळे हुतात्मा चौक (Hutatma Chowk) जवळील अप्सरा पेन शॉपजवळील जागेत १७६ वाहनांकरता अत्याधुनिक स्वयंचलित वाहनतळाची उभारणी करण्यात येत असून या निविदेत विशाल कंस्ट्रक्शन या कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. या वाहनतळ करता सुमारे ९५ कोटी रूपये एवढा निधी खर्च केला जाणार आहे. या कामासाठी प्रकल्प सल्लागार यांनी सुमारे ६२ कोटी रुपयांचा अंदाजित खर्च अपेक्षित म्हणून निविदा मागवली होती, त्यात पात्र ठरलेल्या कंपनीने जी. एस. टी वगळता सुमारे ७० कोटी रुपये आणि जी. एस. टी सह इतर विविध कर अशा प्रकारे या प्रकल्पाचा खर्च सुमारे ९५ कोटींच्या घरात पोहोचला आहे. कंत्राट कंपनीने महापालिकेच्या अंदाजित खर्चापेक्षा ५२ टक्के अधिकची बोली लावून काम मिळवले. मात्र कंत्राटदाराने ५२ टक्के बोली लावल्याने महापालिका प्रशासनाचे नियुक्त केलेल्या सल्लागारांनी कामाचा अंदाजित खर्च सुधारित करून सुमारे ६२ कोटीवरून ६७.५१ कोटी रूपये एवढा केला. त्यानंतर कंत्राटदाराने १० टक्के दर कमी करून वाटाघाटीनंतर ४२ टक्के दरात काम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे या कामाच्या अंदाजित खर्च चुकीचा आहे की कंपनीने जास्त दर आकारून वाढीव दराने काम मिळवण्याचा प्रयत्न केला असा प्रश्न उपस्थित होत आहे. या वाहनतळाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील पाच वर्षे देखभाल व दुरुस्ती ही संबंधित कंपनी करेल. त्यामुळे पुढील पाच वर्षाचा खर्च गृहीत धरून हे कंत्राट देण्यात येत आहे. (Hutatma Chowk Car Parking)
दोन वर्षे झाली तरी नाही कामाचा पत्ता
यापूर्वी माटुंगा रेल्वे स्थानकाच्या जागेत वाहनतळ उभारण्यासाठी रेलकॉन इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड आणि मुंबादेवी येथील मोकळ्या जागेतील वाहनतळासाठी एसएमएस इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या दोन कंपन्या पात्र ठरल्या आहे. या दोन्ही वाहनतळासाठी पात्र कंपन्यांनी अनुक्रमे उणे २.५० टक्के तर ३.३५ टक्के दराने निविदा बोली लावून काम मिळवले. त्यामुळे या दोन्ही वाहनतळांसाठी अनुक्रमे विविध करांसह १२३ कोटी आणि १२२ कोटी रुपये एवढा खर्च करण्यास मंजुरी दिली आहे. ही कंत्राट मंजूर होवून दोन वर्षे उलटत आली आहेत. तरीही कामे सुरू झाली नाहीत. (Hutatma Chowk Car Parking)
(हेही वाचा – Teele Wali Masjid Case : आता ‘या’ मशिदीच्या प्रकरणात मुस्लिम पक्ष हादरला; न्यायालयाने फेटाळली याचिका)
आतापर्यंत मंजूर झालेली वाहनतळ कामे
माटुंगा पूर्व, मध्य रेल्वे स्थानकासमोर
वाहतळाचे बांधकाम : १८ मजले
वाहनांची क्षमता : ४७५
खर्च विविध करांसह १२३
कामाला मंजूरी : फेब्रुवारी २०२२
प्रगती : कामाला सुरूवात नाही
काळबादेवी, मुंबादेवी मंदिराजवळ
प्रस्तावित वाहनतळाची क्षमता : ५४६
वाहतळाचे बांधकाम : १८ मजले
विविध करांसह १२२ कोटी रुपये
कामाला मंजूरी : फेब्रुवारी २०२२
प्रगती : कामाला अद्याप सुरूवात नाही
फोर्ट येथील हुतात्मा चौक जवळील अप्सरा पेन शॉपजवळील जागा
प्रस्तावित वाहनतळाची क्षमता : १७६
खर्च विविध करांसह : ९५ कोटी रुपये
कामाला मंजूरी : फेब्रुवारी २०२४ (Hutatma Chowk Car Parking)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community