मुंबई विमानतळावर एका ८० वर्षीय प्रवाशाचा व्हीलचेअर न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडल्याप्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA Fines Air India) गुरुवारी (२९ फेब्रुवारी) एअर इंडियाला ३० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
(हेही वाचा – Teele Wali Masjid Case : आता ‘या’ मशिदीच्या प्रकरणात मुस्लिम पक्ष हादरला; न्यायालयाने फेटाळली याचिका)
नागरी उड्डाण महासंचालनालयाच्या (डीजीसीए) (DGCA Fines Air India) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले की, वृद्ध प्रवाशाला व्हीलचेअर पुरवण्यात अपयशी ठरल्यामुळे एअर इंडियाला ३० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही घटना मुंबई विमानतळावर १५ फेब्रुवारी रोजी घडली होती.
नेमकी घटना काय ?
फेब्रुवारी १५ रोजी बाबू पटेल (DGCA Fines Air India) आणि त्यांची ७६ वर्षीय पत्नी नर्मदाबेन पटेल या दोघांनीही न्यूयॉर्कहून एअर इंडियाच्या (Air India) एआय-११६ विमानातून उतरल्यावर व्हीलचेअरवरची मागणी केली होती. व्हीलचेअरच्या कमतरतेमुळे एअर इंडियाकडून त्यांना प्रतीक्षा करण्याची विनंती करण्यात आली. मात्र त्यांनी आपल्यापत्नीच्या मदतीशिवायच चालण्याचा निर्णय घेतला.
मुंबई विमानतळावरील इमिग्रेशन प्रक्रियेच्या वेळी बाबू पटेल (DGCA Fines Air India) हे विमानतळ आरोग्य अधिकाऱ्याच्या कार्यालयाजवळ कोसळले. त्यानंतर त्यांना एअर इंडिया कंपनीकडून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
(हेही वाचा – National Stock Exchange : राष्ट्रीय शेअर बाजारात २३.३ लाख नवीन गुंतवणूकदार)
डीजीसीएकडून एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस :
या घटनेनंतर डीजीसीएकडून एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस (DGCA Fines Air India) बजावण्यात आली होती. मुंबई विमानतळ संचालक एमआयएएलच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, व्हीलचेअर सहाय्य ही पूर्णपणे विमान कंपनीने दिलेली सेवा आहे. नागरी विमानचालन आवश्यकतांच्या तरतुदींचे पालन न करणे आणि विमान नियम, १९३७ चे उल्लंघन केल्याचा हवाला देत डीजीसीएने एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस बजावली. सीएआरच्या परिच्छेद ४.१.७ नुसार, विमान कंपन्यांनी अशा प्रवाशांना सर्वसमावेशक सहाय्य प्रदान करणे, प्रस्थान टर्मिनल ते विमानापर्यंतचा त्यांचा अखंड प्रवासाचा अनुभव सुनिश्चित करणे आणि आगमनानंतर उलट करणे बंधनकारक आहे. (DGCA Fines Air India)
(हेही वाचा – Hutatma Chowk Car Parking : हुतात्मा चौकात १७६ वाहन क्षमतेचे मुंबई महापालिकेचे तिसरे वाहनतळ)
एअर इंडियाला सात दिवसांची मुदत :
या नोटीसला (DGCA Fines Air India) उत्तर देण्यासाठी आणि नियामक आवश्यकतांचे पालन करण्यात अपयशी ठरल्याबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी एअर इंडियाला सात दिवसांची मुदत देण्यात आली होती.
यानंतर आता डीजीसीएकडून एअर इंडियाला ३० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community