Amit Shah : ‘अब की बार ४०० पार’वर अमित शहांनी दिली स्पष्ट प्रतिक्रिया; म्हणाले …

अनेक सर्वेक्षणांमध्ये मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत येईल असं सांगितलं जात आहे. मात्र असं असतानाच खरोखरच भाजपाची कामगिरी कशी असेल याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एका खासगी कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी यावर उत्तर दिले.

212
Lok Sabha Election 2024: अमित शहा यांच्या उपस्थितीत महायुतीची महत्त्वाची बैठक, लोकसभेचे जागावाटप अंतिम करणार
Lok Sabha Election 2024: अमित शहा यांच्या उपस्थितीत महायुतीची महत्त्वाची बैठक, लोकसभेचे जागावाटप अंतिम करणार

काही दिवसांपूर्वी म्हणजेच १० फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) अधिसूचित केला जाईल आणि त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे सांगितले. त्यानंतर आता त्यांनी भाजपाच्या ‘अब की बार ४०० पार’ या मिशनबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे.”आम्हाला कोणत्याही सर्व्हेची गरज नाही. मोदींनी सांगितलं आहे की ४०० पार तर निश्चितपणे ४०० पार करणार.” असे अमित शाह यांनी सांगितले आहे.

(हेही वाचा – Nitesh Rane : संजय राऊत यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करून त्यांची चौकशी व्हावी; नितेश राणे यांची मागणी

मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत येईल :

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभीमीवर वेगवेगळे सर्वेक्षणांची आकडेवारी समोर येत आहे. दरम्यान अनेक सर्वेक्षणांमध्ये मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत येईल असं सांगितलं जात आहे. मात्र असं असतानाच खरोखरच भाजपाची कामगिरी कशी असेल याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना एका खासगी कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी यावर उत्तर दिले.

BJP

(हेही वाचा – DGCA Fines Air India : म्हणून डीजीसीएने ठोठावला एअर इंडियाला ३० लाख रुपयांचा दंड)

नेमकं काय म्हणाले अमित शाह ?

एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमामध्ये “२०२४ च्या निवडणुकीचा काऊंटडाऊन सुरु झाला आहे. वेगवेगळ्या आकडेवारी आणि सर्वेक्षण समोर येत आहे, मात्र अमित शाहांचं (Amit Shah) सर्वेक्षण काय सांगतं?” असा प्रश्न विचारला असता; “आम्हाला कोणत्याही सर्व्हेची गरज नाही. मोदींनी सांगितलं आहे की ४०० पार तर निश्चितपणे ४०० पार करणार. यासंदर्भात मनात कोणतीही शंका ठेवण्याची गरज नाही,” असं थेट उत्तर अमित शाह यांनी दिलं. शाहांचा हा आत्मविश्वास पाहून सभागृहामध्ये कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या पाहुण्यांनी टाळ्या वाजवून त्यांना प्रतिसाद दिला. (Amit Shah)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.