PM Surya Ghar Free Electricity Scheme ला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी

या योजनेला तळागाळात लोकप्रिय करण्यासाठी, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायतींना त्यांच्या अधिकारक्षेत्रामध्ये घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रणाली बसविण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल. त्याच वेळी, या योजनेमुळे लोकांना अधिक उत्पन्न मिळवता येईल.

200
PM Surya Ghar Free Electricity Scheme ला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गुरुवार २९ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजने’ला (PM Surya Ghar Free Electricity Scheme) मंजुरी देण्यात आली. या योजनेअंतर्गत १ कोटी घरांना ३०० युनिट मोफत वीज मिळणार असून वर्षाला १५ हजार रुपयांची बचत होणार असल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींनी गेल्या १३ फेब्रुवारी रोजी या योजनेची घोषणा केली होती.

(हेही वाचा – Cross voting case : हिमाचल प्रदेश येथील काँग्रेसचे ६ आमदार अपात्र)

सरकार ७८ हजार रुपये सबसिडी देणार :

या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबासाठी २ किलोवॅटपर्यंतच्या रुफ टॉप सोलर प्लांटची किंमत १४५,००० रुपये असणार आहे. (PM Surya Ghar Free Electricity Scheme) यामध्ये सरकार ७८ हजार रुपये सबसिडी देणार आहे. यासंदर्भात एक राष्ट्रीय पोर्टल सुरू करण्यात आले असून घरमालक त्यावर विक्रेता निवडू शकतील. यासाठी बँकेकडून सुलभ हप्त्यांमध्ये कर्जही उपलब्ध होणार आहे. पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेंतर्गत प्रत्येक गावात मॉडेल सोलर व्हिलेज बनवले जाणार आहे.

(हेही वाचा – Lok Sabha election 2024: १५ ते २० मार्च दरम्यान निवडणूक जाहीर होणार)

अनुराग ठाकूर यांनी सांगितले की,

मंत्रिमंडळाने पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेला (PM Surya Ghar Free Electricity Scheme) ७५,०२१ कोटी रुपयांच्या एकूण खर्चासह एक कोटी घरांमध्ये छतावरील सौर ऊर्जा संयंत्रे बसविण्यास मंजुरी दिली आहे. या योजनेत केंद्र सरकार आर्थिक मदत करते. यानुसार एक किलोवॅट प्रणालीसाठी ३० हजार रुपये अनुदान, दोन किलोवॅट प्रणालीसाठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या प्रणालींसाठी ७८ हजार रुपयांचे अनुदान असणार आहे. याचबरोबर, ग्रामीण भागात रूफटॉप सोलरचा अवलंब करण्यासाठी रोल मॉडल म्हणून काम करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मॉडेल सोलर गावे विकसित केली जातील. या अंतर्गत डिस्कॉमला अतिरिक्त वीज विकून कुटुंबे अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतात. रुफटॉप सोलरद्वारे निवासी क्षेत्रात ३० गिगावॅट सौरऊर्जेची क्षमता वाढणार आहे. या सौर सिस्टम प्रणाली २५ वर्षांत ७२० दशलक्ष टन सीओ-२ समतुल्य उत्सर्जन कमी करतील. या योजनेमुळे उत्पादन, लॉजिस्टिक, पुरवठा साखळी, विक्री, स्थापना, ओ अँड एम आणि इतर सेवांमध्ये सुमारे १७ लाख थेट नोकऱ्या निर्माण होतील असे ठाकूर यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा – Most Powerful Indians : फोर्ब्स इंडियाच्या सर्वाधिक शक्तिशाली सेलिब्रिटींच्या यादीतही पंतप्रधान मोदी ‘नंबर १’)

या योजनेमुळे लोकांना अधिक उत्पन्न मिळवता येईल :

या योजनेला (PM Surya Ghar Free Electricity Scheme) तळागाळात लोकप्रिय करण्यासाठी, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायतींना त्यांच्या अधिकारक्षेत्रामध्ये घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रणाली बसविण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल. त्याच वेळी, या योजनेमुळे लोकांना अधिक उत्पन्न मिळवता येईल, त्यांचे विजेचे बिल कमी येईल आणि लोकांसाठी रोजगार निर्मिती होवू शकेल. चला सौर ऊर्जा आणि शाश्वत प्रगतीला चालना देऊया. मी सर्व निवासी ग्राहकांना, विशेषत: तरुणांना ऑनलाइन अर्ज करत पीएम-सूर्य घर: मोफत वीज योजना दृढ करण्याचे आवाहन करतो असे पंतप्रधान म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.