International Big Cat Alliance च्या स्थापनेला मंजुरी; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब

महा मार्जार प्रजातीच्या प्राण्यांच्या संख्येतील घसरणीला आळा घालून त्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करण्यासाठी संवर्धन विषयक कार्यक्रमाला बळकटी देण्यासाठी आर्थिक पाठबळासह यशस्वी पद्धती आणि मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी या अलायन्सच्या स्थापनेचा उद्देश आहे.

222
International Big Cat Alliance च्या स्थापनेला मंजुरी; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब

केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवार २९ फेब्रुवार रोजी इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सच्या (International Big Cat Alliance) स्थापनेला मंजुरी दिली असून याचे मुख्यालय भारतात असेल. वर्ष २०२३ – २४ ते २०२७ – २८ या ५ वर्षांच्या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमासाठी अर्थसंकल्पीय तरतूद म्हणून १५० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली.

(हेही वाचा – Sharad Pawar : योगेश सावंत ते शरद पवार; काय आहे ब्राह्मण विरोधी कनेक्शन?)

महामार्जार प्रजातीच्या प्राण्यांचे भविष्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची स्थापना :

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागतिक व्याघ्र दिन २०१९ निमित्त केलेल्या भाषणात वाघ, इतर नामशेष होत चाललेल्या प्रजातींच्या संवर्धनासाठी (International Big Cat Alliance) भारताने घेतलेल्या आघाडीच्या भूमिकेची नोंद घेत आशियात सुरु असलेल्या शिकारीला आळा घालण्याचे आवाहन केले होते. भारताच्या व्याघ्र प्रकल्पाला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ९ एप्रिल २०२३ रोजी आयोजित कार्यक्रमात त्यांनी याचा पुनरुच्चार केला. याच कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी महामार्जार प्रजातीच्या प्राण्यांचे तसेच त्यांच्या निवासी जागांचे भविष्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सच्या स्थापनेची औपचारिक घोषणा केली. वाघ आणि या जातीच्या इतर प्राण्यांच्या संवर्धनासाठी अग्रणी आणि दीर्घकाळ उपयुक्त ठरणाऱ्या भारतातील प्रचलित पद्धती इतर अनेक देशांमध्ये देखील राबवल्या जाऊ शकतात.

बिग कॅटमध्ये या प्राण्यांचा समावेश :

बिग कॅट अर्थात महामार्जार जातीच्या (International Big Cat Alliance) प्राण्यांमध्ये वाघ, सिंह, बिबट्या, हिम बिबट्या, पुमा, जग्वार आणि चित्ता या सात प्राण्यांचा समावेश होत असून त्यापैकी वाघ, सिंह, बिबट्या, हिम बिबट्या आणि चित्त हे पाच प्राणी भारतात आढळतात.

(हेही वाचा – Dongri laxmi Building : डोंगरीतील त्या अनधिकृत इमारतीवर महापालिकेने पाच वेळा केली होती कारवाई)

आंतरराष्ट्रीय महामार्जार आघाडीची स्थापना :

महामार्जार प्रजाती (International Big Cat Alliance) आढळणारे तसेच या प्राण्यांच्या संवर्धनात स्वारस्य असलेले आणि या प्राण्यांचे अस्तित्व नसलेले जगातील ९६ देश, संवर्धनातील भागीदार तसेच महा मार्जार प्रजातीमधील प्राण्यांच्या संवर्धनाच्या क्षेत्रात कार्यरत शास्त्रीय संघटना यांसह या कल्याणकारी कार्यात योगदान देऊ इच्छिणारे व्यवसाय समूह आणि कॉर्पोरेट उद्योग यांच्या युतीतून निर्माण झालेली एक बहु-राष्ट्रीय, बहु-संघटना आघाडी म्हणून आंतरराष्ट्रीय महा मार्जार आघाडीची स्थापना करण्यात आली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.