Development Of Pilgrimage Sites : ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांचा सर्वांगीण विकास करणार – गिरीश महाजन

ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाविक आणि यात्रेकरुंना विविध सोयीसुविधा पुरविणे आवश्यक आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या तुटपुंज्या उत्पन्नामुळे या सोयीसुविधा पुरविणे शक्य होत नाही. म्हणून शासनाने ग्रामीण भागातील तिर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी पाच कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय नागपूर येथे झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने घेतला.

139
Development Of Pilgrimage Sites : ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांचा सर्वांगीण विकास करणार - गिरीश महाजन

ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले (Development Of Pilgrimage Sites) व यांच्या समवेत सर्व ह. भ. प. महंत शिवाजी महाराज, लक्ष्मण दशरथ मेंगडे, परमेश्वर गणपत बोधले, लक्ष्मण् बाबुराव तकीक, विरुपाक्ष शिवाचार्य महास्वामी, राधाबाई ज्ञानोबा सानप यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक संत महंत, कीर्तनकार आदिंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan) यांचा विधीमंडळात सत्कार केला व आभार व्यक्त केले.

(हेही वाचा – Dongri laxmi Building : डोंगरीतील त्या अनधिकृत इमारतीवर महापालिकेने पाच वेळा केली होती कारवाई)

तीर्थक्षेत्रांना सुमारे २००० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध :

ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या ‘ब’ वर्गातील तीर्थक्षेत्रांचा (Development Of Pilgrimage Sites) पायाभूत विकास होण्याकरिता शाश्वत वाढीव निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेला नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मंजुरी देण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून तीर्थक्षेत्रांना सुमारे २००० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. तसेच पर्यटन विभागामार्फत देखील प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत सुमारे १००० कोटी रुपयांचा निधी तीर्थक्षेत्रांच्या पर्यटन विकासासाठी उपलब्ध करुन दिला आहे.

‘भव्य काशी दिव्य काशी’ : 

प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या ‘भव्य काशी दिव्य काशी’, बद्री केदार देवस्थान विकास, उज्जैन येथील महाकाल कॉरिडॉर, अयोध्यास्थित प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिर विकास या संकल्पनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महत्वपूर्ण अशा ‘ब’ वर्गातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेस मंजुरी देण्यात आली. आता ‘ब’ वर्गातील तीर्थक्षेत्रांना (Development Of Pilgrimage Sites) दोन कोटी ऐवजी पाच कोटींचा विकासनिधी उपलब्ध होत आहे.

(हेही वाचा – Kitchen Garden Bmc school : महापालिका शाळांमधून घडणार भावी शेतकरी)

भाविक आणि यात्रेकरुंना विविध सोयीसुविधा पुरविणे आवश्यक :

ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांच्या (Development Of Pilgrimage Sites) ठिकाणी भाविक आणि यात्रेकरुंना विविध सोयीसुविधा पुरविणे आवश्यक आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या तुटपुंज्या उत्पन्नामुळे या सोयीसुविधा पुरविणे शक्य होत नाही. म्हणून शासनाने ग्रामीण भागातील तिर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी पाच कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय नागपूर येथे झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने घेतला. १६ नोव्हेंबर २०१२ नंतर २ कोटी या मर्यादेत निधी मंजूर केलेल्या तिर्थक्षेत्रांना नविन प्रस्तावित निकषाप्रमाणे ३ कोटी इतका निधी मंजूर करण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

४८० तीर्थक्षेत्रांना होणार लाभ

राज्यात ‘ब’ वर्ग दर्जा असलेली एकूण ४८० तीर्थक्षेत्र (Development Of Pilgrimage Sites) आहेत. या तीर्थक्षेत्रांना वाढीव निधीचा लाभ होणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.