Sion Railway Flyover : सायन उड्डाणपूल पाडण्याचा निर्णय दुसऱ्यांदा स्थगित

212
Sion Flyover वर मोहरमच्या मिरवणुकीला प्रवेशबंदी
सध्या इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे आता धोकादायक बनलेला सायन रेल्वे उड्डाणपुल (Sion Railway Flyover) पाडण्याचे काम पुन्हा रखडले आहे. चालू असलेल्या परीक्षांमुळे २२ मार्च २०२४ पर्यंत धोकायदायक सायन रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करू नयेत, अशी विनंती वाहतूक पोलिसांनी मध्य रेल्वेकडे केली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन मध्य रेल्वेने या उड्डाणपुलाचे पाडकाम पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन वेळा पूल पाडण्याचे नियोजन रद्द केले 

मध्य रेल्वेची लोकल सेवा आणखी क्षमतेने चालवणे आणि लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या ये-जा करण्यात अडचण निर्माण होऊ नये, यासाठी पाचव्या व सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी ब्रिटिशकालीन ११० वर्षे जुना सायन उड्डाणपूल (Sion Railway Flyover) पाडण्याचे नियोजन पालिका आणि मध्य रेल्वेने केले होते. याआधी २० जानेवारी २०२४ रोजीपासून हा पूल बंद करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला होता. मात्र, शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या विनंतीवरून हे काम पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर २९ फेबुवारी २०२४ ही तारीख निश्चित केली होती. यासंदर्भात मंगळवारी मुंबई वाहतूक पोलिस आणि मध्य रेल्वे यांच्यात तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत सहपोलिस आयुक्त यांनी दहावी-बारावीच्या परीक्षा असल्यामुळे पूल (Sion Railway Flyover) बंद करू नका, त्यामुळे विद्यार्थांना वाहतूक कोंडीचा फटका बसू शकतो. त्यामुळे २२ मार्चनंतर पूल वाहतुकीसाठी बंद करण्याची विनंती केली. त्यानुसार मध्य रेल्वेने या उड्डाणपुलाचे पाडकाम पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.