- सचिन धानजी, मुंबई
महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांच्या वापरासाठी भाडेतत्त्वावर घेण्यात येणाऱ्या २० साध्या रुग्णवाहिका (Ambulances) आणि ०५ हृदयरोग (कार्डियाक) रुग्णवाहिका आदींचा खर्च दोन कोटींनी वाढला जाणार आहे. सद्या भाडेतत्त्वावर या दोन्ही प्रकारच्या रुग्णवाहिकांची मुदत मार्च २०२४ रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे या सेवा भाडेतत्त्वावर घेण्यासाठी सुमारे १२.७० कोटी रुपये खर्च केला आहे, पण पुढील दोन वर्षां करता हा खर्च १४.७७ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. (Ambulances)
मुंबई महानगरपालिकेच्या ९ रुग्णालयांकरता २० साध्या रुग्णवाहिका आणि ०५ हृदयरोग (कार्डियाक) रुग्णवाहिका भाडेतत्त्वावर घेण्यात येत आहे. त्यानुसार २० मार्च २०२२ पासून या रुग्णवाहिकांची सेवा घेण्यात येत आहे. निर्मल एंटर प्रायजेस या कंपनीच्या माध्यमातून ही रुग्णवाहिका सेवा घेण्यात येत आहे. दोन वर्षांच्या या सेवांसाठी यासाठी महापालिकेने १२ कोटी ७० लाख ६३ हजार रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली होती. पण आता हे कंत्राट १९ मार्च २०२४ रोजी संपुष्टात येत असल्याने नव्याने निविदा मागवली आहे. या निविदेत खांडेश्वर टोविंग ही कंपनी पात्र ठरली आहे. या कंपनीला दोन वर्षांच्या सेवा करता १४.७७ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. (Ambulances)
(हेही वाचा – Sion Railway Flyover : सायन उड्डाणपूल पाडण्याचा निर्णय दुसऱ्यांदा स्थगित)
सद्या साध्या रुग्णवाहिकांसाठी (Ambulances) पहिल्या वर्षी प्रति पाळी करता २,२५० रुपये आणि दुसऱ्या वर्षांकरता २,३४९ रुपये मोजले जात आहेत. पण मार्च २०२४ पासून पुढील दोन वर्षां करता अनुक्रमे २,५२९ रुपये आणि २,८०८ रूपये एवढा दर आकारला जाणार आहे. त्यामुळे पहिल्या वर्षां करता सुमारे ३०० रुपये आणि दुसऱ्या वर्षां करता सुमारे ५०० रुपयांची प्रति पाळी मध्ये वाढ झाली आहे. (Ambulances)
सद्या हृदयरोग (कार्डियाक) रुग्णवाहिका (Ambulances) करता पहिल्या वर्षी प्रति पाळी करता ३,१०५ रुपये आणि दुसऱ्या वर्षांकरता ३,२४० रुपये मोजले जात आहेत. पण मार्च २०२४ पासून पुढील दोन वर्षां करता अनुक्रमे ३,५१९ रुपये आणि ३,९०७ रूपये एवढा दर आकारला जाणार आहे. त्यामुळे पहिल्या वर्षांकरता सुमारे ४०० रुपये आणि दुसऱ्या वर्षांकरता सुमारे ७०० रुपयांची प्रति पाळीमध्ये वाढ झाली आहे. (Ambulances)
घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण, २०२१ नुसार दिनांक १ एप्रिल, २०२२ पासून शासकीय वापरासाठी भाडेतत्तावर घेण्यात येणारी सर्व वाहने ही बॅटरी इलेक्ट्रिक असतील. परंतु, सध्या बाजारात आवश्यक असलेल्या रुग्णवाहिन्या (Ambulances) इलेक्ट्रिक वाहनांच्या रूपात उपलब्ध नसल्याकारणाने व हे काम अत्यंत आवश्यक व अव्याहत स्वरूपाचे असल्याकारणाने डिझेल अनुरुप वाहने भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. (Ambulances)
(हेही वाचा – SSC Exam : शुक्रवारपासून दहावीची परीक्षा सुरु; यंदा ३२ हजार विद्यार्थी वाढले)
या रुग्णालयांमध्ये आहेत इतक्या रुग्णवाहिका
केईएम रुग्णालय : ३ साध्या रुग्णवाहिका, १ कार्डीयाक रुग्णवाहिका
नायर रुग्णालय : ४ साध्या रुग्णवाहिका, १ कार्डीयाक रुग्णवाहिका
शीव लोकमान्य टिळक रुग्णालय : ४ साध्या रुग्णवाहिका, १ कार्डीयाक रुग्णवाहिका
कुपर रुग्णालय : १ साधी रुग्णवाहिका, १ कार्डीयाक रुग्णवाहिका
ट्रामा केअर रुग्णालय : १ साधी रुग्णवाहिका, १ कार्डीयाक रुग्णवाहिका
बोरीवली सर्वसाधारण रुग्णालय : १ साधी रुग्णवाहिका
जीटीबी रुग्णालय, शिवडी : ३ साध्या रुग्णवाहिका
कस्तुरबा रुग्णालय : १ साधी रुग्णवाहिका
गोरेगाव सिध्दार्थ रुग्णालय : १ साधी रुग्णवाहिका (Ambulances)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community