Sandeshkhali Violence : मीच लोकांना बोलावून ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला; नराधम Shahjahan Sheikh ने दिली गुन्ह्याची कबुली

केंद्रीय एजन्सींच्या अटकेपासून वाचवण्यासाठी बंगाल पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याला सर्व प्रकारची सुविधा पुरवली जात आहे, असा आरोप भाजपने केला आहे.

227

पश्चिम बंगालच्या सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसने संदेशखाली (Sandeshkhali Violence) येथे महिलांवर अत्याचार करणाऱ्या शाहजहान शेख याला ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे. त्याने पोलिसांसमोरआपणच अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांच्या विरोधात जमाव भडकावल्याची कबुली दिली आहे. ईडी त्याला अटक करेल अशी त्याला भीती वाटत होती, असे तो म्हणाला. त्यामुळे त्याने लोकांना बोलावून ईडी अधिकारी आणि सीआरपीएफ जवानांवर हल्ला करण्याचे आदेश दिले, असे शाहजहान शेखने (Shahjahan Sheikh) सांगितले.

महिलांवरील अत्याचाराचे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी 

शाहजहान शेख (Shahjahan Sheikh) याला बंगाल पोलिसांनी गुरुवारीमी 29 फेब्रुवारी रोजी सकाळी उत्तर 24 परगणा येथील मीनाखान परिसरातून अटक केली. सुमारे 55 दिवस फरार असलेल्या शेखला बशीरहाट न्यायालयात हजर करण्यात आले, जिथून त्याला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच वेळी, केंद्रीय एजन्सींच्या अटकेपासून वाचवण्यासाठी बंगाल पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याला सर्व प्रकारची सुविधा पुरवली जात आहे, असा आरोप भाजपने केला आहे. संदेशखाली प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यासाठी कलकत्ता उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सोमवारी, ४ मार्च २०२४ रोजी सुनावणी होणार आहे.

(हेही वाचा Sambhaji Bhide : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पू. संभाजी भिडे गुरुजींच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न)

शाहजहानच्या साथीदारालाही अटक 

संदेशखाली येथील महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या शाहजहान शेखच्या (Shahjahan Sheikh) प्रकरणाबाबत पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारला डोकेदुखी झाली आहे. आता ही डोकेदुखी टाळण्यासाठी तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) शाहजहान शेख याची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. यासह त्याच्या प्रकरणाचा तपास बंगाल पोलिसांच्या सीआयडी शाखेकडे सोपवण्यात आला आहे. रिमांड कॉपीच्या पहिल्या पानात शाहजहानने तपास अधिकाऱ्यांसमोर गुन्ह्याची कबुली दिल्याचे म्हटले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांवरील हल्ल्यात आपला हात असल्याची कबुली त्याने दिली आहे. बंगाल पोलिसांनी शाहजहान शेखचा (Shahjahan Sheikh) आणखी एक जवळचा सहकारी अमीर अली गाझी यालाही अटक केली आहे. त्याला ओडिशातील राउरकेला येथून अटक करण्यात आली आहे. संदेशखाली येथील ग्रामस्थांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळल्याचा आरोप अमीर अलीवर गेल्या काही दिवसांत करण्यात आला होता. तो महिलांना धमकावून मनरेगा कामगारांकडून त्यांच्या मजुरीचे पैसे घ्यायचा.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.